BANNER

The Janshakti News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टीच्या ) वतीने लोकशाहीर साहितरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन



======================================
======================================

इस्लामपूर : वार्ताहर                     दि. १९ जुलै २०२३

 लोकशाहीर साहितरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाटेगाव येथील त्यांच्या जन्म गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टीच्या )वतीने अभिवादन करण्यात आले.
बार्टीच्या वतीने दरवर्षी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व  स्मृतिदिन साजरी करण्यात येते तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावर्षी बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने अभिवादन करण्यात आले , प्रारंभी अण्णाभाऊंच्या जन्म घर स्मारक व शिल्पसृष्टी येथे भेट देण्यात आली. यावेळी दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सव्वाखंडे यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या अर्धाकृति पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला,समतादुत अंकुश चव्हाण ,विक्रांत शिंदे, सागर आढाव, शहाजी पाटील ,संग्राम छत्रे ,संयोगिता हेरकर, आबासाहेब भोसले ,लता सुरवसे,सविता पाटील, उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆