BANNER

The Janshakti News

CRIME NEWS - भिलवडी , वसगडे व तुंग येथील घरफोडीचा गुन्हा उघड.. ..स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची मोठी कामगिरी



======================================
==============================



सांगली : वार्ताहर                 दि. 19 जुलै 2023

सांगली जिल्ह्यातील भिलवडी , वसगडे , तुंग या भागातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात सांगली पोलिसांना यश आलं आहे. यामध्ये बंद घराची कुलूपं तोडून सोन्या-चांदीचे दागिने, चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला सांगली पोलिसांनी अटक केली आहे.
या चोरट्यां कडून सोन्या-चांदीचे दागिने व काही मोबाईल असा 3 लाख 11 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आर्या डिगंबर भोसले वय २० वर्षे. रा
कारंदवाडी. ता वाळवा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण , सांगली शहर , भिलवडी व आष्टा पोलीस ठाणे या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार
पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली यांना जिल्हयातील उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून सदर पथकाला सांगली जिल्हयातील उघडकीस न आणलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्हयांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

चोरी केलेले सोन्या चांदिची दागिने व मोबाईल विक्री करण्यासाठी एक इसम पाचवामैल चौकात येणार आहे. त्याचे अंगात निळया रंगाचा चौकटी शर्ट आहे. अशी बातमी पथकातील पोहेकॉ मच्छिंद्र बर्डे व पोशि अभिजित ठाणेकर यांना खास बातमीदारामार्फत मिळाली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता एक इसम मिळालेल्या बातमीप्रमाणे मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव आर्या डिगंबर भोसले. ता वाळवा असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ सोन्या-चांदीचे दागिने व 3 मोबाईल असा 3 लाख 11 हजार 200 रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल मिळून आला.
आर्या डिगंबर भोसले याच्याकडे आणखी माहिती घेत घरफोडीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याचे मित्र तुषार काळे, बोक्या काळे व करण काळे यांनी मिळून भिलवडी, तुंग व वसगडे येथून बंद घराची कुलपे तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले असल्याचे तसेच त्याचे जवळील मोबाईल हे सांगली, आष्टा व पुणे येथून चोरी केलेची कबुली दिली.

दरम्यान, चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने, व मोबाईल याबाबत तपास करुन त्याचेकडून 3 लाख 11 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करुन पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

दत्तात्रय नारायण देवार्डे रा.चोपडेवाडी ता.पलूस यांनी त्यांच्या राहत्या घरातून रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद दि. ०६/०४/२०२३ रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती. भिलवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर भा.द.वि.कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने त्यास पुढील तपास कामी जप्त मुद्देमालासह भिलवडी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली , अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील , पोलिस निरीक्षक सतीश शिंदे स्था.गु.अ.शाखा सांगली यांचे मार्गदर्शनाखाली
स्था. गु. अ. शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक, विशाल येळेकर, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोहेकॉ बिरोबा नरळे, पोहेकॉ मच्छिंद्र बर्डे, पोहेकॉ  नागेश खरात , पोना  सागर टिंगरे, पोहेकॉ  लोहार, पोना सोमनाथ गुंडे, पोकॉ  रोहन घस्ते, पोकॉ अभिजित ठाणेकर, पोकॉ  विक्रम खोत , पो.कॉ. कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆