BANNER

The Janshakti News

दिव्यांगांच्या खात्यात अंबाजोगाई नगरपालिकेने २५ लाख तर परळी वैजनाथ नगरपालिकेने ६ लाख रुपये केले वर्ग ; डॉ. संतोष मुंडे यांची माहिती




==============================
==============================

परळी वैजनाथ :               दि. ११ जुलै २०२३

(प्रतिनिधी - महादेव गिते)

  शासनाने दिव्यांगांसाठी स्वनिधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगांसाठी खर्च करा असे आदेश ग्रामविकास विभागाने दोन २०१८ साली पारित केला होता. त्यानुसार मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील नगरपालिकांकडून दिव्यांगांना लाखो रुपयांची मदत झाल्याची माहिती धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली.


       
दिव्यांगांच्या खात्यात अंबाजोगाई नगरपालिकेने तब्बल २५ लाख तर परळी वैजनाथ नगरपालिकेने ६ लाख रुपये केल्याचीही माहिती डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे. बहुतांश ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या दिव्यांगांच्या योजनेबाबत निरुत्साही असतात. मात्र ना. धनंजय मुंडे हे सातत्याने दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी संवेदनशील आहेत, सोबतच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यादेखील आस्थेने दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. तसेच संबंधित ज्येष्ठ नेते वाल्मिक कराड व नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्री. कांबळे व मुख्यधिकारी अशोक साबळे यांनी दिव्यांगांप्रति दाखवलेले कर्तव्यनिष्ठतेसाठी सर्व मान्यवरांचे डॉ. संतोष मुंडे यांनी आभार मानले आहेत. 


परळी व अंबाजोगाई शहरातील दिव्यांगांच्या ज्यांच्या कोणाच्या खात्यावर जर अनुदान पडले नाहीत तर डॉक्टर संतोष मुंडे मोबाईल 9822280568 या नंबरवर संपर्क साधावा. परळी व अंबाजोगाई येथील दिव्यांगांच्या खात्यावर  केल्याबद्दल  राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार धनंजय मुंडे जिल्हाधिकारी मॅडम, ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड मुख्याधिकारी डॉ.संतोष मुंडे यांचे विशेषता दिव्यांग बांधव  साजन लोहिया, अनंत लोखंडे, विष्णू आघाव, रामलिंग घनचक्कर, सय्यद सुभान, जावेद सय्यद, दिगंबर नागराळे, रवींद्र जगतकर,, सुनिता कवले, शीला धायगुडे, सुरेश गवते, दीपक धोकटे, अमोल जोशी, प्रशांत घेवारे, अशा नागरगोजे, संजय जाधव, तुळशीराम प्रयाग, प्रकाश टिके, संजय नखाते, लोढा अरिहंत, संतोष बल्लाळ, उद्धव फड, संदेश कापसे, प्रमोद आमले, अभिजीत स्वामी, संजय घोबाळे, दत्ता काटे यांनी आभार मानले आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆