BANNER

The Janshakti News

सुधारित शैक्षणिक धोरणा निमित्त जिल्ह्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन ...समन्वयक म्हणून सुनील कुमार नल्लथ यांची निवड.=====================================
=====================================

पलूस : वार्ताहर                      दि. २४ जुलै २०२३

भारत सरकार द्वारा जुलै २०२० मध्ये सुधारित शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले. नवीन धोरण लागू करून ३ वर्ष पुर्ण होत आहेत. या निमित्ताने सरकार द्वारे वेगवेगळया कार्यक्रमांचे तसेच परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे . या धोरणा विषयची माहिती सर्व सामान्यांपर्यंत सहजपणे पोहचविता येईल हा उद्देश आहे.
या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थी हा संपुर्ण शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रभाग असणार आहे. विद्यार्थी केंद्रित शिकविण्याच्या पदधती, मुख्य विषयांचा कला, संगीत आणि किडा इत्यादी विषयाशी केलेला समन्वय आणि वेगवेगळ्या कौशल्य निर्मितीवर असलेला भर. हे नव्या शैक्षणिक धोरणाचे महत्वाचे घटक आहेत.नव्या धोरणाच्या लागू करण्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आणि केंद्रिय विद्यालय या शैक्षणिक संस्थांचा अत्यंत महत्वाचा  वाटा आहे. जवाहर नवोदय विद्यालय, पलूस जि. सांगली येथे हि या नवीन धोरणांची अमंलबजावणी प्रभावीरित्या केली जात आहे. नवीन धोरणांच्या अंतर्गत ज्या शिक्षण पद्धती वापरल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यात आनंद वाटतो आणि अभ्यासाचे त्यांना ओझे वाटत नाही.
नवोदय विद्यालय समिती दिल्ली यांच्या तर्फे सांगली जिल्हयाचे पलुस येथे स्थित जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनिलकुमार नल्लथ यांची नवीन शैक्षणिक धोरणाचा जिल्हय़ात प्रचार आणि प्रसार करण्या करिता समन्वयक म्हणून निवड केली आहे. जवाहर नवोदय विद्यालय सांगली, हे राष्ट्रस्तरावर एक उत्कृष्ठ विद्यालय म्हणुन ओळखले जाते. समन्वयक म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रसार करण्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबविले. या अंतर्गत कार्यशाळा, परिसंवाद, वेबिनार्स आणि विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. हे सर्व प्रकल्प  सांगली जिल्हयाचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे .  पलुस तालुक्याचे तहसिलदार  निवास  ढाणे, माध्यमिक चे शिक्षणाधिकारी  राजेसाहेब लोंढे , प्राथमिक चे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचे संपूर्ण सहकार्य लाभत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆