BANNER

The Janshakti News

भिलवडी पोलिसांची कारवाई.. एका अल्पवयीन बालकांकडून घरफोडी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत..======================================
======================================


भिलवडी : वार्ताहर                 दि. २५ जुलै २०२३

भिलवडी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०५/०४/२०२३ रोजी रात्री दत्तात्रय नारायण देवार्डे रा. चोपडेवाडी (बोरबन ) ता.पलूस यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश करुन बेडरूम मधील तिजोरीमध्ये ठेवलेले २,२६,०००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच देवार्डे यांच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणारे महेशकुमार संभाजी पाटील , पाटील वस्ती सुखवाडी यांच्याही घरातील देवघरा मधील तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीत ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ८४०००/- रु. असा एकूण ३,१०,०००/- रु. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. अशी फिर्याद दत्तात्रय नारायण देवार्डे यांनी दि. ०६/०४/२०२३ रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर भा.द.वि.स.कलम ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आर्या डिगंबर भोसले वय २० वर्षे. राकारंदवाडी. ता वाळवा याला यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नुकतेच पाचवामैल येथून १,४४,०००/- रु किंमतीच्या मुद्देमालासह अटक केली होती. यावेळी
आर्या डिगंबर भोसले याने त्याचे मित्र तुषार काळे, बोक्या काळे व करण काळे यांनी मिळून भिलवडी, तुंग व वसगडे येथून बंद घराची कुलपे तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले असल्याची कबुली दिली होती. या अनुषंगाने त्यास पुढील तपास कामी जप्त मुद्देमालासह भिलवडी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले होते.


सदर गुन्हयाच्या तपासाच्या अनुशंगाने अधिक तपास करीत असताना भिलवडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती वरुन आज दिनांक २५.०७.२००३ रोजी एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेवून त्याचे कडुन सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली MH11 AX 7233 होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटारसायकल असा एकूण २,१९,०००/- रुपये किंंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.


सदरची कारवाई भिलवडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत , सपोफौ महेश जाधव , पोहेकॉ शौकत इनामदार , पोना तानाजी देवकुळे , पोकॉ विशाल पांगे , पोकॉ मंगेश गुरव , पोकॉ धीरज खुडे , चालक पोहेकॉ दिपक पाटील , सायबर पोलीस ठाणे कडील कॅप्टन गुंडवाडे , विवेक साळुंखे यांनी केली आहे.

गुन्ह्याचा अधिक तपास भिलवडी पोलीस करीत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆