=====================================
=====================================
कुंडल:वार्ताहर दि. ०९ जून २०२३
कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक बिन विरोधच्या वाटेवर.
क्रांती कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. अर्ज भरण्याची तारीख दि 5 जून 9 जून अखेर होती. आज शेवटच्या दिवशी सर्व म्हणजे 21 जागेवर, तेवढेच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडणूक होण्याचे संकेत मिळाले आहेत.
क्रांती कारखान्याने अल्पावधीत शेतकरी सभासदांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. आजवर ऊसाची सर्व देणी व कर्मचारी पगार ही वेळेत दिले आहेत. कारखाना ऊस विकास सुविधा पूर्ण ताकदीने राबवित असल्याने ऊसाचे क्षेत्र वाढले तर आहेच पण कमी क्षेत्रात जास्त उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे यामुळे शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. यामुळे सभासद शेतकऱ्यांनी आमदार अरुणअण्णा लाड यांच्या व्यवस्थापनाला पुन्हा एकदा संधी दिल्याने शेतकरी वर्गात ही समाधान व्यक्त होत आहे.
येत्या 26 तारखेला औपचारिकता पूर्ण केली जाईल. अर्ज दाखल केल्यावर क्रांतीअग्रणी डॉ.जी.बापूंच्या नावाने कार्यकर्त्यांकडून घोषणा देऊन जल्लोष करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. एस. एन. जाधव यांनी काम पाहिले.
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त अर्ज भरून बाहेर पडताना एकच जल्लोष करताना कार्यकर्ते, सोबत आमदार अरुणअण्णा लाड, शरद लाड आदी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆