BANNER

The Janshakti News

राजकीय स्वार्थासाठी समाजमाध्यमावर भडकाऊ भाषण करणाऱ्या, समाजात दुही निर्माण करणाऱ्या, अशांतता पसरवणाऱ्या लोकावर कायदेशीर कारवाई करा. ...वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस प्रमुखाना निवेदन...


सर्व जाती धर्मातील लोकांनी शांतता अबाधित ठेवावी - वंचित बहुजन आघाडीचे आवाहन


======================================
======================================

सांगली : वार्ताहर               दि. ०९ जून २०२३



सांगली ही समाजसुधारक, महामानवांची भूमी आहे. सांगली जिल्ह्यात सर्व जाती धर्मातील लोक आनंदाने नांदत आहेत. देशभरात सांगली हा पुरोगामी जिल्हा समजला जाते. महाराष्ट्राला समाजसुधारकांचा गौरवशाली इतिहास आहे. सांगली जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, राजाभाऊ ढाले, वसंतदादा पाटील इ. क्रांतिकारक, लेखक, कलाकार यांचा इतिहास राहिला आहे. या शांतताप्रिय सुसंस्कृत सांगली जिल्ह्यात काही नतद्रेष्टे, राजकीय स्वार्थासाठी, प्रसिद्धीसाठी हापापलेले स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाजात अशांतता पसरवणारे भडकाऊ भाषण देत आहेत व समाजमन कलुषित करत आहेत. तरुण मुलाची माथी भडकवत आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान करीत आहेत त्यांना दिशाहीन बनवले जात आहे.त्या मुलांना गुन्हेगारी क्षेत्रात ढकलण्याचे काम सुरू आहे. भारत देशाचे भवितव्य उज्ज्वल बनवणारी भावी पिढी लोप पावत आहे. धोक्यात आले आहे. जाती जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे सामाजिक सलोखा व सामाजिक भाईचारा नष्ट करण्यासाठी काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे जे प्रसिद्धीसाठी हापापलेले आहेत ते स्वतः च्या राजकीय स्वार्थासाठी समाजात दूही माजवणारे वक्तव्य करून समाजात द्वेषाची पेरणी करून आराजकता निर्माण करण्याचे काम सध्या या लोकाकडून सुरू आहेत. महाराष्ट्रातील काही संवेदनशील जिल्ह्यात निष्पाप लोकांचा बळी गेलेचे दिसत आहे. उच्च शिक्षित मुली तसेच महिला ही सुरक्षित नाहीत, मुंबई सारख्या मोठ्या शहरात उच्च शिक्षित असणारी मुलगी तसेच महिलेवर अत्याचार होत आहेत या व्यवस्थेचे बळी पडले आहेत. प्रशासन अपयशी ठरले आहे. तसेच सांगलीमध्ये, मिरज शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना ताजी असतानाच तुंग या गावात बालिकेवर अतिप्रसंग करणेचा प्रयत्न लिंग पिसाटाने नराधमाने केला. प्रसंगावधान राखून त्या बहाद्दूर मुलीने आरडाओरड केली व त्याच्या तावडीतुन सुटका करून घेतलीने ती वाचली अन्यथा ही बाब जीवघेणी ठरली असती.
प्रकरणी मुलीच्या आईने तात्काळ सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून संबंधित आरोपीला अटक करणेत आली आहे, या निर्दयी प्रवृत्ती मुळे सर्वसामान्य माणूस त्रासलेल्या आहे. पोलीस प्रशासनाचा विश्वास ढासळत चालला आहे. त्याचबरोबर, सांगली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जातीय दंगलीचे वादळ सांगली मिरजेत धडकण्याच्या आधीच अशा समाजमाध्यमावर भडकाऊ भाषण करणारे समाजकंटक, राजकीय लोभी, राजकीय संधीसाधू लोकांचा बंदोबस्त करावा. 

सांगली जिल्हा प्रशासनास वंचित बहुजन आघाडी विनंती करते की, असे समाजमाध्यमातून समाजात अशांतता पसरवू पाहणाऱ्या लोकावर सांगली जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रत्येक हालचाली वर लक्ष वेधून कठोरात कठोर कारवाई करावी व अश्या राजकीय संधीसांधूना जेरबंद करावे असे आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी व सांगली जिल्हा पोलिसप्रमुख यांना देण्यात आले आहे. 


यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे,चंद्रकांत खरात, नझिर झारी, आनंदसागर पुजारी, चंद्रकांत कोलप, सतीश शिकलगार, इरफान केडिया, दत्तात्रय होतमुखे आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆