BANNER

The Janshakti News

उद्योजक श्रीपाद चितळे यांचेकडून भिलवडी शिक्षण संस्थेस तीन लाख रुपयांची देणगी.======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर             दि. १० जून २०२३

भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  चितळे उद्योग समूहाचे पार्टनर उद्योजक श्रीपाद चितळे व त्यांच्या परिवाराकडून भिलवडी शिक्षण संस्थेस रुपये तीन लाख रुपयांची देणगी देण्यात आली. 
श्रीपाद चितळे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अनघा चितळे,कन्या मेघना चितळे व सुपुत्र निखिल  चितळे या चार सदस्यांनी प्रत्येकी पंच्याहत्तर हजार अशी एकूण तीन लाख रुपये देणगी दिली.देणगीचा धनादेश  संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, सचिव मानसिंग हाके, संचालक डी.के. किणीकर, संजय कदम, सहसचिव के. डी पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभाचे औचित्य साधून ही देणगी दिली असल्याचे मनोगत श्रीपाद चितळे यांनी व्यक्त केले.


 सचिव मानसिंग हाके  यांनी चितळे उद्योग समूह व परिवाराचे संस्थेच्या वतीने  आभार मानले.
 या कार्यक्रमास प्राथमिक विभाग प्रमुख प्रा. सौ.एम.बी.पाटील,
बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे,सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी चे मुख्याध्यापक संजय मोरे,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे, ग्रंथपाल श्री खराडे  उपस्थित होते.


श्रीपाद चितळे यांच्या हस्ते देणगीचा धनादेश स्वीकारताना विश्वास 
चितळे,डी.के.किणीकर, संजय कदम,मानसिंग हाके आदी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●●●◆●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆