BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संकुलात सेमी इंग्लिश स्कूलचा शुभारंभ ; उत्साहमय वातावरणात नवागतांचे स्वागत                                     व्हिडीओ
                            👇

=====================================
==============================

भिलवडी वार्ताहर :       दि. १० / ०६ / २०२३

भिलवडी (ता.पलूस) : भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेमी इंग्लिश स्कूल भिलवडी या विद्यालयाच्या कामकाजाचा शुभारंभ व नावागतांचे स्वागत उद्योजक श्रीपाद चितळे व सौ.अनघा चितळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना श्रीपाद चितळे म्हणाले की,भिलवडी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांच्या गरजा ओळखून विविध दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत आहे.चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केलेल्या सेमी इंग्लिश स्कूल मधून गुणवंत विद्यार्थी घडतील.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या मूळ इमारतीचे पुनर्जीवन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया असे आवाहनही त्यांनी केले.

भिलवडी शिक्षण संस्थे मधील विविध शाळांनी आदर्शवत असे  विद्यार्थी घडविले याचा पालक म्हणून मला अभिमान आहे असे प्रतिपादन सौ.अनघा चितळे यांनी केले.

 यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी.के. किणीकर,संजय कदम,जयंत केळकर,डॉ.सुनिल वाळवेकर,संस्थेचे सचिव मानसिंग हाके,सहसचिव के.डी.पाटील, प्राथमिक विभागप्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,सेकंडरी स्कूलचे उपमुख्याध्यापक विजय तेली,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सुरैय्या तांबोळी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.सौ.प्रगती भोसले यांनी सूत्रसंचालन केले.सुकुमार किणीकर यांनी आभार मानले.सेमी इंग्लिश स्कूल मधील शिक्षिक प्रतिभा पवार,मानसी किणीकर,सुफिया 
पठाण,सेविका अंबिका खुबीकर यांचे तसेच नवागतांचे स्वागत मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆