BANNER

The Janshakti News

पोलीस भरती परीक्षेतील नियम बदला ; ॲड दिपक लाड

              पलुस तहसीलदारांना दिले निवेदन..



=====================================
=====================================

पलूस | दि.११एप्रिल२०२३

पोलीस भरती परीक्षा प्रक्रियेमध्ये  विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत पलूस तालुक्यातील पोलीस भरतीसाठी सराव करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्ट मंडळांने ॲड दिपक लाड यांच्या नेतृत्वाखाली   पलूसचे तहसीलदार श्री निवास ढाणे यांना निवेदन दिले.

पोलीस भरतीचा सराव करणारे विद्यार्थ्यी एकाच वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज करत आहेत.

 
विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्हा व्यतिरिक्त मुंबई मध्ये फॉर्म फरले आहेत, शासनाचे आदेश व परिपत्रकानुसार एका विद्यार्थ्याला एकच फॉर्म भरता येतो, परंतू तो आदेश प्रत्यक्ष लागू केला नसल्याने काही उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी यावेळी डबल फॉर्म भरले आहेत.

डबल फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना दोन ठिकाणी लेखी परीक्षा देता येते. त्यामुळे प्रामाणिकपणे एकच फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांवर  मोठा अन्याय होत आहे. तरी शासनाने प्रामाणिक कष्ट घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घ्यावी व प्रामाणिक विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, या समस्येवर विद्यार्थ्यांना न्याय  मिळण्यासाठी  पलूसचे तहसीलदार यांना ॲड दीपक लाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.

पलूसचे तहसीलदार श्री निवास ढाणे यांना निवेदन देताना रणसंग्राम सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड दिपक लाड , संतोष कोळी, निशांत कदम, खलील मुल्ला ,शुभम संकपाळ, प्रथमेश परीट, प्रथमेश धोत्रे दीपक भोसले आदी विद्यार्थी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆