BANNER

The Janshakti News

भिलवडीत भिम जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी होणार साजरा




======================================
======================================

भिलवडी | दि.११ एप्रिल२०२३

पलूस तालुक्यातील भिलवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ यांच्या वतीने भिलवडी पंचशिलनगर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य जोतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले या विषयावर इयत्ता ३ री ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.या निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना तसेच उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.तसेच


बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी रात्री ८:०० वाजता महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ५०० पेक्षा जास्त कार्यक्रम सादर केलेल्या भीमराज गीत प्रबोधन मंच, आटपाडी यांचा भीम-बुध्द गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरूवार दिनांक १३ रोजी सकाळी नेत्र तपासणी शिबीर, लहान मुलांच्यासाठी विविध कार्यक्रम तर सायंकाळी ७ :०० वाजता महिला-मुलींचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तर रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करून भीम जयंती आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच




शुक्रवार दिनांक १४ एप्रिल रोजी पहाटे अंकलखोप येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, झेंडा वंदन कार्यक्रम तसेच त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांच्यासह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सायंकाळी ४ वाजता पंचशिलनगर येथून विविध पारंपारिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शासनाच्या नियमांचे पालन करीत, परंपरेनुसार अत्यंत शांततेत व उत्साहात भिलवडी गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक निघणार आहे. यामध्ये , ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवतींचा मोठ्या संख्येने सहभाग असणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆






◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆