BANNER

The Janshakti News

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्फत मोठ्या उत्साहात साजरी...======================================
======================================

सांगली | दि.१४ एप्रिल २०२३

विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती ही राष्ट्रीय अध्यक्ष आद.अॕड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्फत साजरी करण्यात यावेत असे आदेश दिले होते, त्यांच्या आदेशानुसार शुक्रवार दि.१४/०४/२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडी, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रा मार्फत लक्ष्मी मंदिर परिसर, सांगली येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.सर्वप्रथम विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार मा.आंनदसागर पुजारी,मनपा क्षेत्र अध्यक्ष यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.तसेच दिपप्रज्वलन या.संजय भूपाल कांबळे जिल्हा संघटक यांनी केले. यावेळी कुपवाड शहरातील भिम ज्योत आगमन झाले.भिम ज्योतचे स्वागत करण्यात आले.बुद्ध संस्कार विधी आयु.दयानंद कांबळे यांनी घेतली.उपस्थित जनसमुदायाला मिठाई वाटप करण्यात आली.यावेळी सांगली शहर अध्यक्ष मा.शिवाजी उर्फ पवण वाघमारे, मनपा उपाध्यक्ष मोहन साबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे ,
गजानन पाटील, उपाध्यक्ष इरफान केडिया,अतुल दादा ओमसे, दादासाहेब मोरे, विजय लांडगे, राहुल कांबळे, हिरामण भगत, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆