BANNER

The Janshakti News

वाय. डी चौगुले तात्या निस्पृह कर्मयोगी --प्रा. युवराज पाटिल=====================================
=====================================

पलुस | दि. १४ एप्रिल २०२३

बुर्ली ता पलुस येथील सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी स्व. वाय डी चौगुले यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त आयोजीत "चला आदर्श कुटुंब घडवूया" या विषयावर बोलताना प्रा. युवराज पाटिल बोलत होते.
पलुस तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर स्व तात्यांना आदरांजली वहाण्यासाठि उपस्थित होते.


तात्यांचे व्यक्तिमत्व फार प्रेरणादायी होते. त्यांच्यातील समाजसेवक राजकारणापेक्षा वरचढ होता. तात्या काॅंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. स्व. प्रकाशबापु व स्व. पतंगराव कदम साहेब यांच्या विचारधारेला त्यांनी आयुष्यभर वाहुन घेतले होते. असे मत व्यक्त करत अनेक मान्यवरांनी स्व. तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला.


यावेळी राजारामबापू सह. साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बापू पवार, बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील, कृष्णा सह. साखर कारखान्याचे संचालक मा.शिंदे सर, किसान पत संस्थेचे चेअरमन अनिल भाऊ लाड, अजित शिरगावकर, जि. प.सदस्य नितीन बाबा नवले, शितल बिरनाळे, सतिश पाटील अंकलखोप, सुनील काका सावंत, अरुण नाना सावंत, दादा पाटील घोगाव, मोहन आण्णा पाटील हातनूर, मोहन भाई पटेल पलूस, आकाराम भाऊ पाटील आमणापूर, मा.सरपंच अशोक पवार पलूस, बुली॔तील सर्व संस्थाचे पदाधिकारी, सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते
प्रास्ताविक सतिश चौगुले यांनी केले तर आभार जयवंतराव चौगुले यांनी व्यक्त केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆