BANNER

The Janshakti News

भीम प्रतिष्ठानतर्फे नवोदित वकिलांचा भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार
=====================================
=====================================

सोलापूर | दि.१५ एप्रिल२०२३

सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भीम प्रतिष्ठानतर्फे भारतीय संविधानाची प्रत देऊन नवोदित वकिलांचा सत्कार करण्यात आला. 
   या कार्यक्रमास भारती विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. कीर्ती राज व जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह रजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. आकाश कापुरे, ॲड. चैतन्य केंगार, ॲड. अक्षय वाघमारे, ॲड. अक्षय जगताप या नवोदित वकिलांचा याप्रसंगी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 
   प्रतिष्ठानचे संस्थापक दलितमित्र बाबा बाबरे, अध्यक्ष समाजभूषण वीरेंद्र हिंगमिरे यांनी सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सिद्धांत बाबरे यांनी केले तर ॲड. विशाल मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकबर शेख, प्रेम अंकुश, ॲड. कसबे, ॲड. मोरे यांनी परिश्रम घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भीम प्रतिष्ठानतर्फे भारतीय संविधानाची प्रत देऊन नवोदित वकिलांचा सत्कार करण्यात आला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

https://youtube.com/@thejanshakatinews5707

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆