BANNER

The Janshakti News

भिलवडी परिसरातील शेती क्षारपडमुक्त करण्यासाठी खा. संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नांना व सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या पाठपुराव्याला यश... क्षारपड निर्मूलनासाठी पहिल्या टप्प्यात नाला सफाई, खोलीकरण, रुंदीकरण कामास प्रारंभ
======================================
======================================

भिलवडी | दि.२४ एप्रिल २०२३

महाराष्ट्र शासन जलसंपदा यांत्रिकी विभाग सांगली यांच्यामार्फत नाले रुंदीकरण खोलीकरण व सफाई करणे या कामाचा शुभारंभ झाला या कामांमध्ये महावीर नगर ते बाळू मोहिते शेत, बाळासाहेब मोहिते शेत ते स्व.सुभाष दादा पाटील यांचे शेत कृष्णा नदीला जोडणारा हा नाला आहे तसेच अनिल मगदूम शेत ते महावीर नगर सरळी ओढा, भवनेश्वरी वाडी ते खंडोबाची वाडी पर्यंत नाला सफाई करणे यामध्ये नाल्या मधून पाणी व्यवस्थित वहावे व क्षारपड जमीन चा प्रकल्प राबवण्यास सोपे जावे यासाठी या नाल्यांची खुदाई व रुंदीकरण करून सफाई करीत आहेत.


वरील नाल्याच्या सफाई रुंदीकरण व खोलीकरण करणे या सर्व कामाचा खर्च महाराष्ट्र शासन जलसंपदा यांत्रिकी विभाग सांगली यांच्याकडून करण्यात येत आहे यासाठी लागणाऱ्या सर्व जेसीपी पोकलँड यासाठी लागणारे सर्व कामगार या सर्व खर्चाचा तपशील महाराष्ट्र शासन यांत्रिकी विभाग सांगली हे करीत आहेत. भिलवडी पंचक्रोशी मध्ये कमीत कमी दोन हजार एकर क्षेत्राला याचा फायदा होईल जे क्षेत्र क्षारपड आहे ते क्षारपडमुक्त व्हावे यासाठी भिलवडी परिसरातील शेतकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्याकडे क्षारपड मुक्त जमिनी व्हाव्या यासाठी मागणी केली होती.


 शेतीचा सर्व विचार करता सुरेंद्र भैय्या वाळवेकर व परिसरातील शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांच्याकडे ही मागणी केली की जर क्षारपड क्षेत्र जर चांगल्या शेतीमध्ये रूपांतर झाले तर शेतकऱ्यांचा सध्या होणारा तोटा होणार नाही व शेतकरी यांना उत्पादन वाढिस हातभार लागेल या सर्व गोष्टीचा विचार करता खासदार संजय काका पाटील यांनी जलसंपदा यांत्रिकी विभाग यांच्याकडून तातडीने या कामाचा पहिला टप्पा सुरू केला यामुळे तर पुढील क्षारपड निर्मूलनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सचिद्र पाइप बसवण्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल व भिलवडीतील शेतकऱ्यांना क्षारपड जमिनीतून मुक्त करून त्यांचे उत्पन्न वाढेल असे आश्वासन खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहे.

भिलवडी परिसरातील नालेसफाई रुंदीकरण व खोलीकरण हे काम सुरू झाले आहे सध्या एक जेसीपी मशीन लावून काम सुरू आहे अजून या कामासाठी चार मशीन्स लावून लवकरात लवकर हे काम युद्धपातळीवर पूर्ण करणार आहेत.सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी सांगितले पावसाळा जवळ येत आहे यामुळे खासदार संजय काका पाटील यांनी हे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या आहेत भिलवडी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होती जर क्षारपड शेती चांगल्या शेतामध्ये रुपांतर झाले तर शेतकऱ्यांची उत्पन्न वाढण्यास मदत होईल त्यामुळे काकांनी आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन हे काम तातडीने सुरू केले आहे. पुढील टप्प्यांमध्ये क्षारपड मुक्त शेती होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करावे लागतील त्या त्या गोष्टी आम्ही भिलवडी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्यासाठी करणार आहोत व लवकरच भिलवडी परिसरातील शेती क्षारपड मुक्त होईल असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रभैय्या वाळवेकर यांनी शेतकऱ्यांना दिला.

क्षारपड निर्मूलनाचे पहिल्या टप्प्याचे काम सुरू केल्याने खासदार संजय काका पाटील व सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या बद्दल भिलवडी परिसरातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे
यावेळी विजय चोपडे माजी सरपंच, प्रदीप शेटे, शितल चौगुले इंजिनिअर, धनपाल चौगुले गुरूजी,राजेंद्र चौगुले सर, अनिल मगदूम,संकेत चौगुले, किशोर तावधर,मनोज चौगुले, संदेश चौगुले, सनी गायकवाड,अमित चौगुले,स्वप्नील चौगुले,शितल अण्णा चौगुले,अशोक चौगुले,नंदू यादव उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆