BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयात बालकुमार ज्ञानकोपरा उपक्रमाचा शुभारंभ...



                               व्हिडीओ
                                    👇

                             व्हिडीओ
                                  👇

                           व्हिडीओ
                                👇


=====================================
=====================================

भिलवडी | दि. २३ एप्रिल २०२४

भिलवडी ता.पलूस  येथील सार्वजनिक वाचनालयात उन्हाळी सुट्टी अंतर्गत वाचन चळवळ वृध्दींगत करण्याच्या हेतूने बालकुमार ज्ञानकोपरा उपक्रम सुरू करण्यात आला.

सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

भिलवडी सार्वजनिक वाचनालयाने मोठ्या प्रमाणात ग्रंथ संपदा उपलब्ध करून दिली आहे.बालमित्रांनो तुम्ही नित्य नियमाने वाचनालयात या,पुस्तकांशी मैत्री करून ज्ञानाच्या कक्षा वाढवा असे आवाहन यावेळी बालवाचकांशी संवाद 
साधताना गिरीश चितळे यांनी केले.

बालसाहित्यिक ह. रा.जोशी व शरद जाधव यांनी विद्यार्थ्यांना बालकविता, बालकथांचे सादरीकरण करून वाचन चळवळीचे महत्व आपल्या मनोगतातून सांगितले.रुद्र गायकवाड याने 'वाचाल तर वाचाल 'या विषयी प्रभावी भाषण सादर करून  
उपस्थित बालचमूंची मने जिंकली.वाचनालयाचे कार्यवाह या उपक्रमाचे मार्गदर्शक साहित्यिक सुभाष कवडे यांनी उन्हाळी सुट्टीत हा उपक्रम वाचनालय कशा पद्धतीने राबविणार असल्याचे सांगून,सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत  बालवाचकांसाठी वाचनालय खुले राहणार असून मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी जी.जी.पाटील,डी.
आर.कदम,जयंत केळकर,रमेश पाटील,रमेश चोपडे,बाळासो माने,महादेव जोशी, वामन काटीकर,सौ.विद्या निकम,सौ.अपूर्वा 
नलवडे आदींसह वाचक उपस्थित होते.



  बालकुमार ज्ञानकोपरा शुभारंभ प्रसंगी गिरीश चितळे,सुभाष कवडे,ह.रा.जोशी,डी.आर.कदम,जी.जी.पाटील आदी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆