BANNER

The Janshakti News

रामानंदनगर येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी                        व्हिडीओ पहा
                     👇


=====================================
=====================================

पलूस | दि. ३० मार्च २०२३

रामानंदनगर ता.पलूस  येथे रामनवमी मोठ्या  उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे यंदाही रामनवमी उत्सव  रामानंदनगर येथे  मोठ्या उत्साहात साजरा झाला. रामनवमीनिमित्त येथील राम मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता .आज सकाळपासून कीर्तन भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बरोबर बारा वाजता श्रीरामाचा जन्मकाळ संपन्न झाला.यावेळी हजारो भाविकांनी फुले वाहिली. आरती आणि पाळणा महिलांनी म्हटला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


रामनवमी निमित्त तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खिरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  सुंठवड्याचा प्रसाद देण्यात आला ,श्रींची मिरवणूक काढण्यातआली, शोभेचे दारू काम करण्यात आले. त्याचबरोबर भिलवडी येथील स्वर गंगा महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला आहे आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प गणेश डांगे महाराज कडेगाव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आले आहेत तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य समिती यांनी केले आहे .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆