BANNER

The Janshakti News

सांगली जिल्ह्यात कायमस्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्त यांची तात्काळ नेमणूक करा.


वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कामगार मंत्र्यांना निवेदन...


                      व्हिडीओ पहा
                        👇


=====================================
=====================================

सांगली | दि. ३० मार्च २०२३

आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी श्रमिक,कष्टकरी, कामगारांच्या न्याय व हक्कासाठी लढा देण्यास निर्माण केलेली कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन,सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश (भाऊ) खाडे यांना पालकमंत्री कार्यालय दालनात प्रत्यक्ष भेटून निवेदना द्वारे विनंती करण्यात आले की, सांगली जिल्ह्यातील तत्कालीन कामगार सहाय्यक आयुक्त मा.अनिल गुरव साहेब हे आपल्या नियुक्ती कारकिर्दीत गोरगरीब,श्रमिक, कष्टकरी, कामगारांचे विविध प्रश्न सोडवून मार्गी लावले आहेत, कामगारांना योग्य तो न्याय देण्याचे चांगले काम केलेले आहे.आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावत होते परंतु मा.अनिल गुरव साहेब यांची नियुक्ती मुंबई येथे कामगार उपायुक्त म्हणून बढती झाली असल्याने, मुंबई मध्ये आपला पदभार घेतलेला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात कामगार कार्यालयात कर्तव्य व निष्ठेने, जबाबदारीने काम पाहणारे सहाय्यक आयुक्त नसल्याने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी योजना देणे, कामगारांचे इतर विविध प्रश्न सोडवून न्याय देण्याचे काम थांबले आहेत. सांगली जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात कामगारांच्या कामाची दखल तसेच जबाबदारी घेण्यास सक्षम अधिकारी नसल्याने निर्णय प्रलंबित राहत आहेत,कामगारांना हातावरचे पोट व वरचेवर कामधंदा सोडून कार्यालयीन कामानिमित्त सतत हेलपाटे मारावे लागत आहेत,यामुळे कामगारांचे आर्थिक अडचणीत भर पडत आहे, कार्यालयात वरिष्ठ अधिकारी नसल्याने कामाचे नियोजन व नियंत्रण होत नाहीत. यामुळे कामगारांचे वेळ व आर्थिक भुर्दंड तसेच मानसिक ताण तणावांना सामना करावा लागत आहे,तरी आपण सर्व बाबींचा बारकाईने विचार करून सांगली जिल्ह्यात कामगार सहाय्यक आयुक्तसो यांची कायमस्वरूपी नेमणूक करून, सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतुन श्रमिक,कष्टकरी बांधकाम कामगारांचे लाभासाठी
दाखल केलेले अर्ज तपासून निकालात काढण्यासाठी आपले आदेश पारित व्हावेत अशी आम्ही आपल्याकडे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री या नात्याने आपणास विनंती करीत आहोत. तरी लवकरच कायम स्वरुपी सक्षम अधिकारी यांची नेमणूक करून गोरगरीब, श्रमिक, कष्टकरी बांधकाम कामगारांच्या कुटुंबीयांच्या शुभेच्छा घ्याव्यात असे निवेदनात म्हटले आहे. 


यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचेपश्चिम महाराष्ट्र महासचिव मा. प्रशांत वाघमारे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित यावेळी जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, संपर्क प्रमुख संजय कांबळे, तसेच जिल्हा महासचिव अनिल मोरे(सर),मिरज तालुका अध्यक्ष इसाक सुतार, मिरज शहर अध्यक्ष असलम मुल्ला,संगाप्पा महादेव शिंदे, शरीफ अमीर शेख,आनंद गाडे,योगेश साबळे,  जावेद आलासे, दिपक कांबळे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆