yuva MAharashtra जबरी चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश, पाठलाग करुन शिताफीने मुद्देमाल व हत्यारासह केले ०३ आरोपी जेरंबद

जबरी चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश, पाठलाग करुन शिताफीने मुद्देमाल व हत्यारासह केले ०३ आरोपी जेरंबद

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कामगिरी


=====================================
=====================================


सांगली | दि. ३१ मार्च २०२३

तासगाव येथे द्राक्ष व्यापाऱ्याकडील तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची लुट करणाऱ्या तिघाजणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले.

 नितीन खंडू यलमार वय वर्षे २२ , विकास मारूती पाटील वय वर्षे ३२ , आणि अजित राजेंद्र पाटील वर्षे २२ , सर्व रा. मतकुणकी ता.तासगाव अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

याप्रकरणी महेश शितलदास केवलाणी रा. पिंपळगाव ता. निफाड जि. नाशिक यांनी  तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

अवघ्या काही तासात पोलिसांनी लुटीचा छडा लावल्याने कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वा सात ते साडे सातच्या सुमारास तासगाव येथील गणेश कॉलनी परिसरात हा प्रकार घडला होता. द्राक्ष व्यापारी असलेले महेश केवलाणी हे तासगाव तालुक्यातील द्राक्षे खरेदी करतात. मंगळवारी त्यांनी सांगलीतून एक कोटी १० लाख रुपयांची रोकड घेऊन त्यांची स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच 15 जीएफ 0215 मधुन दिवाणजी राजेंद्र माळी व चालक आकाश चव्हाण यांच्या सह तासगावमध्ये आले होते. याचवेळी संशयितांनी दुचाकी आडवी मारून केवलाणी यांची  स्कॉर्पिओ अडविली त्यांना तलवारीचा धाक दाखवून, दिवाणजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पैशाची बॅग घेऊन ते पसार झाले होते.सायंकाळच्यावेळी इतकी मोठी रक्कम लुटण्यात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. एलसीबीच्या पथकाकडून तपास सुरू असताना, ही लुट मतकुणकी येथील नितीन यलमार याने केल्याची व तो साथीदारांसह मणेराजूरी येथील शिकोबा डोंगराजवळ निर्जनस्थळी असल्याची माहिती खात्रीशीर बातमीदार याच्याकडून मिळाली. त्यानुसार पथकाने तिथे छापा मारून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना हत्यारासह ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याजवळ एक कोटी ९ लाख रुपयांची रोकड, तीस हजार रुपये किंमतीची दुचाकी आणि धारदार तलवार असा माल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली , उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे , तासगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली
 पोलीस निरीक्षक सतिश शिंदे , पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार सागर टिंगरे, संदीप गुरव, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे , अनिल कोळेकर, संदीप पाटील, संतोष गळवे, विक्रम खोत, चेतन महाजन, प्रशांत माळी, सुनिल लोखंडे, अमोल ऐदाळे, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, अजय बेद्रे, गौतम कांबळे, सचिन कनप, दिपक गठ्ठे, गजानन घस्ते, सुधीर गोरे यांनी केली आहे.
आरोपी याने गुन्हा करतेवेळी वापरलेल्या स्प्लेंडर मोटार सायकल बाबत सपोनि संदीप शिंदे यांनी अधिक माहिती घेतली असता सदरची मोटार सायकल ही आरोपी  नितीन खंडू यलमार, वय- २२ रा मतकुणकी ता. तासगाव याने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील किल्ले मच्छिंद्रगड येथून चोरली असल्याचे कबुल केले असून सदरचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. 

 पुढील तपास अश्विनी शेडगे , उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगावं या करीत आहेत.


घटनेचे गांभीर्य ओळखून स्व:ता पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी तपासात लक्ष घातले. यानंतर एलसीबीच्या पथकाला अवघ्या आठ तासातच या टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश आले. या कामगिरीचे कौतुक म्हणून द्राक्ष व्यापारी महेश केवलाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांचा सन्मान करुन आभार मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆