BANNER

The Janshakti News

जिवनामध्ये योग्य दिशा मिळणेसाठी विशेष श्रमसंस्कारांची गरजः सौ. धनश्रीताई लाड.



======================================
======================================
कुंडल | दि. 16 मार्च 2023
--------------------------------------------------------------------
       जिवनामध्ये  योग्य दिशा मिळण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीरांची गरज असून महाविद्यालयीन युवकांनी अशा शिबिरामध्ये भाग घेणे गरजेचे असल्याचे मत क्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई लाड यांनी व्यक्त केले त्या मोहिते वडगाव(ता.कडेगाव) येथे क्रांतीअग्रणी डाॕ.जी.डी.बापू लाड महाविद्यालय, कुंडल यांचे वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी  त्या बोलत होत्या यावेळी मो.वडगाव च्या सरपंच सौ.शितल मोहिते, उपसरपंच दत्तात्रय मोरे, माजी सरपंच विजयराव मोहिते, राष्ट्रवादीच्या कडेगाव तालुका अध्यक्ष सौ. वैशाली मोहिते, पुजा लाड, ग्रा. सदस्या सौ. वर्षा सावंत, प्राचार्य डाॕ. जे.ए.पाटील, प्रा. डाॕ. प्रताप लाड, समन्वयक प्रा.डाॕ. दत्तात्रय खळदकर
  आदी मान्यवर उपस्थित होते.
     धनश्रीताई पुढे म्हणाल्या युवा वर्गांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या शिबीरामध्ये शिकण्यासारखे बरेच असते मन लावून शिबिरामध्ये सहभागी होऊन शिबीरामध्ये मिळालेले चांगले अनुभव बरोबर घेऊन त्याचा उपयोग आपल्या जिवनामध्ये करावा.
      माजी सरपंच विजय मोहिते म्हणाले कुंडल व मो.वडगाव चे जुने जिव्हाळ्याचे संबध आहेत, महाविद्यालयाचे गावच्या विकासासाठी मोठे योगदान असलेचे सांगून  यापूर्वीच्या शिबीराच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
      प्रारंभी स्व.डाॕ. क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड व स्व.डाॕ.पतंगराव कदम यांच्या प्रतिमेंचे पुजन करणेत आले.सुत्रसंचलन प्रा. सौ.स्वप्नाली लाड यांनी केले तर आभार प्रा. डाॕ. सुभाष चवरे यांनी मानले. 
 याप्रसंगी प्रा. डाॕ. धनंजय होनमाने,प्रा. डाॕ. सुभाष चवरे, प्रा.डाॕ. प्रविणकुमार लुपणे, प्रा. गणेश खारगे, प्रा.डाॕ. बाळकृष्ण वाघमारे, प्रा. डाॕ.नवनाथ गुंड, प्रा.डाॕ. विवेकानंद माने, प्रा. कुरणे, प्रा.सुरज साळुंखे, प्रा. विश्वास सावंत, प्रा. किरण शिंदे, प्रा. उर्मिला बंडगर, प्रा. सौ.स्नेहा  काटे, प्रा. सौ. नम्रता पाटील, प्रा. सौ.अनुराधा पवार, प्रा. सौ.तेजस्वी जाधव, प्रा, सौ. माया जाधव,प्रा. सौ. प्रियांका पाटील, आदीसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.


मो.वडगाव(कडेगाव) येथे क्रांतिअग्रणी डाॕ.जी.डी.बापू लाड महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सौ.धनश्रीताई लाड, यावेळी उपस्थित मो.वडगाव च्या सरपंच सौ.शितल मोहिते, उपसरपंच दत्तात्रय मोरे, माजी सरपंच विजयराव मोहिते,  सौ. वैशाली मोहिते,पुजा लाड, सौ. वर्षा सावंत, प्राचार्य डाॕ. जे.ए.पाटील, प्रा. डाॕ. प्रताप लाड, समन्वयक प्रा.डाॕ. दत्तात्रय खळदकर आदी.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆



◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆