BANNER

The Janshakti News

पारधी सामाजाच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी तीव्र आंदोलन छेडणार - सुधाकर वायदंडे=====================================
==============================

पलूस | दि. १५ मार्च २०२३
--------------------------------------------------------------------

सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसनासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
          याबाबतचे निवेदन दलित महासंघाच्या वतीने सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार श्री.निवास ढाणे यांना दिले.


          यावेळी सुधाकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने संस्थापक दिवंगत प्रा. मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलने, मोर्चे काढून पारधी पुनर्वसनासाठी लढा सुरु आहे.शासन स्तरावर पुनर्वसन कारणेबाबत आदेश पारीत झालेले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे पारधी समाज सर्व योजनापासून अजूनही वंचितच राहिलेला आहे.
              वायदंडे म्हणाले,पलूस तहसील कार्यालयासमोर प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलने करण्यात आलेली आहेत परंतु तात्पुरते आश्वासन देऊन प्रशासनाने कायम वेळ मारून नेलेली आहे. तालुका प्रशासनाने पुनर्वसन करणेसाठी कोणताही ठोस प्रतिसाद दिलेला नाही. गावातील लोक ऐकत नाहीत म्हणत वेळ मारून नेलेली आहे.
                तसेच काही गावातून पुनर्वनाला विरोध करून पारध्यांना हाकलून देण्याचे प्रकार घडलेले आहेत याची दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. एक गाव एक पारधी कुटुंब या योजनेप्रमाणे काही कुटुंबाना गावे मिळाली परंतु घरकुलाचा प्रश्न प्रलंबितच आहे तसेच अजूनही काही कुटुंबांचे पुनर्वसन गावामध्ये झालेले नाही.


            आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करावे अन्यथा दलित महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
                 निवेदनावर प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे,दिनकर नांगरे,ता. अध्यक्ष जनार्दन देवकुळे,इंद्रजित काळे, उषा चव्हाण, जयश्री चव्हाण,शांताराम चव्हाण, शिवाजी चव्हाण, अमृत पवार, काजल चव्हाण यांच्या सह्या आहेत.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆