BANNER

The Janshakti News

क्रांती महिला प्रतिष्ठानच्या वतीने "मिशन हिमोग्लोबिन" अभियान सुरु ... आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते उद्घाटन..

======================================
======================================

कुंडल | दि. १२ मार्च २०२३
---------------------------------------------------------------------

महिलांमधील सात्यत्याने कमी होणारे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढीसाठी क्रांती महिला प्रतिष्ठानने "मिशन हिमोग्लोबिन" सुरू केले, कुंडल (ता.पलूस) येथे तालुक्यातील सर्व महाविद्यालयीन मुलींनी यामध्ये सहभाग घेतला.

हा उपक्रम क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड यांच्या संकल्पनेतून गेल्यावर्षी महिला दिनी महिलांमध्ये सुरू करण्यात आला होता यंदा तो युवतींमध्ये सुरू करण्यात आला. या अभियानाचे उद्घाटन आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड प्रमुख उपस्थित होत्या.

यावेळी तालुक्यातील भिलवडीचे सेकंडरी हायस्कुल, काकासाहेब चितळे महाविद्यालय, पलूसचे पंडित विष्णू दिगंबर विद्यालय, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालय, रामानंद नगर येथील स्वामी रामानंद विद्यालय, डॉ.पतंगराव कदम कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, कुंडलच्या अकॅडमीक हाय.व ज्यूनी. कॉलेज, किर्लोस्कर वाडीच्या किर्लोस्कर हायस्कुल, कुंडलच्या क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड महाविद्यालय व प्रतिनिधी हायस्कुल येथील विद्यार्थिनींनी या मिशनमध्ये सहभाग घेतला.

डॉ.सुविनय दामले यांनी सांगितले, हिमोग्लोबिन औषधांनी काही काळ वाढेल पण तो टिकवण्यासाठी जीवनात व जेवणात आवश्यक तो बदल करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, आजच्या मुली भविष्यात स्त्रिया होणार आहेत, याच स्त्रिया पुन्हा कुटुंबाचा आधार असतात मग आधार भक्कम असल्याशिवाय कुटुंब कसे उभा राहील यासाठी मुलींनी सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी क्रांती महिला प्रतिष्ठान मार्फत महिलांमधील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांती महिला प्रतिष्ठानच्या वतीने "मिशन हिमोग्लोबिन" मध्ये बोलताना आमदार अरुणअण्णा लाड, बाजूस वैद्य सुविनय दामले, धनश्री लाड.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆●◆●◆●◆◆◆●◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●◆●◆●