BANNER

The Janshakti News

खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या पाठपुराव्याने भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये 18 कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर

भिलवडी जिल्हा परिषद गटांमध्ये लागेल तेवढा निधी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे ; सुरेंद्र भैय्या वाळवेकर 

======================================
======================================

भिलवडी |  दि.10 मार्च 2023
--------------------------------------------------------------------

          सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या विशेष पाठपुराव्याने 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भिलवडी जिल्हा परिषद गटातील ब्रम्हनाळ गावच्या हद्दीतील  गारपिर ते भिलवडी स्टेशन रस्ता ग्रामा 51 रस्ता सुधारणा करणे 3 कोटी रुपये, खटाव सटवाई रस्ता ग्रामा 22 रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 50 लाख रुपये, भिलवडी स्टेशन ते वसगडे प्राजीमा क्रमांक 122 रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 50 लाख, माळवाडी वसगडे रस्ता प्राजीमा क्रमांक 33  कॅनॉलवर लहान पूल बांधणे 2 कोटी 50 लाख रुपये, नागाव ते वसगडे रस्ता रुंदीकरण करणे 3 कोटी रुपये ,चोपडेवाडी ते कदमवस्ती रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाख 82 हजार रुपये इतका भरीव निधी अर्थसंकल्पामध्ये खासदार संजय काका पाटील यांनी मंजूर केला यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी सर्व कामांसाठी पाठपुरावा केला 
       भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये ब्राह्मनाळ, वसगडे, खटाव, चोपडेवाडी, माळवाडी या भागातील नागरिकांची रस्त्यासाठी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्याकडे होती या मागणीप्रमाणे सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे या निधीसाठी मागणी केली व सतत कागदोपत्री पाठपुरावा केला व खासदार संजय काका पाटील यांनी सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या मागणीमुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भिलवडी जिल्हा परिषद गटातील व सांगली जिल्ह्यातील विविध मागण्या ठेवल्या व या सर्व मागण्या मंजूर केल्या. या सर्व  रस्त्यासाठी निधी मंजूर करावा असा आग्रह केला त्यामुळे 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये खासदार संजय काका पाटील  यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्या
      भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या विशेष  पाठपुराव्यामुळे खासदार संजय काका पाटील यांनी 23 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला यासाठी ब्राह्मणाळ ,वसगडे, खटाव, चोपडेवाडी, माळवाडी गावातील नागरिकांच्या मधून माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर व खासदार संजय काका पाटील यांचे विशेष कौतुक होत आहे
     यावेळी माजी जिल्हा परिषद सुरेंद्र भैय्या वाळवेकर म्हणाले 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये जो रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला तो निधी खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर झाला आहे  इथून पुढील काळात भिलवडी जिल्हा परिषद गटांमध्ये लागेल तेवढा निधी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे



खासदार संजय काका पाटील ,माजी जि.प.सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆●◆●◆●◆●