BANNER

The Janshakti News

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद लाड उमेदवार आहेत असे गृहीत धरून तयारीला लागा...मेहबूब शेख ; राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष
======================================
======================================

कुंडल | दि.२८ जानेवारी २०२३

सध्याचे राजकारण स्थिर नाही, नेहमी बदलते आहे त्यामुळे शरद लाड यांचे संघटन आणि नेतृत्व पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढील उमेदवार शरद लाडच आहेत असे गृहीत धरून तयारीला लागा.

असे सूतोवाच युवक राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले. ते कुंडल (ता पलूस) येथे पलूस-कडेगाव तालुका राष्ट्रवादी तर्फे आयोजित शरद युवा संवाद यात्रेत बोलत होते. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून " शरद युवा संवाद" यात्रेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधत असताना जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक अध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थित होते.


मेहबूब शेख म्हणाले, पलूस कडेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात आपल्या शाखा सुरू करा, आपल्या विचारांचे कार्यकर्ते उभे करा त्यांना सक्षम करा यातूनच शरद लाड यांना बळ मिळेल.

यावेळी शरद लाड म्हणाले, युवकांनी पुढं काय करायचं आहे, काय साध्य करायचं आहे यासाठी ही संवाद यात्रा आहे. यातून राष्ट्रवादी पक्ष सामान्यांच्या मनात रुजवणे हे उद्दीष्ठ आहे. राष्ट्रवादीची ध्येय धोरणे भक्कम असल्याने प्रत्येकाचे भविष्य उज्वल आहे. दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचा, त्यांच्या अडचणी सोडवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कडेगाव तालुका अध्यक्ष जयदीप यादव, अरुण आसबे, पलूस तालुकाध्यक्ष मोहन पाटील, विनायक महाडिक, डी.एस.देशमुख, सुरेश शिंगटे, पूजा लाड, विराज पवार, श्रीकांत आरबुने, नागेश पाटील, रोहित वडेर, विनोद जाधव,यांचेसह पलूस कडेगाव तालुक्यातील युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कडेगाव तालुक्यातील मनसेचे सचिव प्रशांत पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी मेहेबूब शेख आणि शरद लाड यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆