yuva MAharashtra ➡️ सांगली येथील विष्णू अण्णा फळ मार्केट मधे कांदा विकण्यासाठी पंढरपूर (कासेगाव) येथून आलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून मारहाण.. ➡️ संबंधित व्यापाऱ्यावरती कडक कारवाई व्हावी व त्याचा परवाना निलंबित करावा.. ➡️ स्वाभिमानी शेतकरी संघटनेची व शेतकऱ्यांची मागणी

➡️ सांगली येथील विष्णू अण्णा फळ मार्केट मधे कांदा विकण्यासाठी पंढरपूर (कासेगाव) येथून आलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून मारहाण.. ➡️ संबंधित व्यापाऱ्यावरती कडक कारवाई व्हावी व त्याचा परवाना निलंबित करावा.. ➡️ स्वाभिमानी शेतकरी संघटनेची व शेतकऱ्यांची मागणी



➡️                          *व्हिडिओ पहा*                                                                       👇                                     


   



======================================

===============================

सांगली | दि. 04 जानेवारी 2023

विष्णू अण्णा फळ मार्केट कोल्हापूर रोड सांगली येथे दिनांक 02-01-2023 रोजी कांदा विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून मारहाण झाली त्या व्यापाऱ्यावरती कडक कारवाई व्हावी व त्याचा परवाना निलंबित करावा यासाठी प्रशासक डी डी आर मंगेश सुर्वे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संदीप राजोबा यांनी व शेतकऱ्यांनी निवेदन दिले. विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये अमरसिंह देशमुख रा. कासेगाव ता. पंढरपूर येथील शेतकरी आपला कांदा विकण्यासाठी फळ मार्केटमध्ये आला असता बनशंकरी एंटरप्राइजेस मधील स्वप्निल पाटील व इतर तीन जणांनी मिळून तुझा कांदा दुसरीकडे का विकलास आमच्याकडे का विकला नाहीस म्हणून लाथाबुक्यानी मारहाण केली व इथून पुढे या मार्केटमध्ये कसा येतोस ते पाहतो तुझ्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली. झालेला सर्व प्रकार संबंधित दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सदरची तक्रार शेतकऱ्याने सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये देखील केलेली आहे. संबंधित शेतकरी हा पंढरपूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्या शेतकऱ्याने सचिन पाटील यांच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला. लगेचच संदीप राजोबा यांनी प्रशासक डी डी आर मंगेश सुर्वे यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला व प्रत्यक्ष वसंतदादा मार्केट यार्ड या ठिकाणी भेटून निवेदन दिले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली की, त्या व्यापाराचा परवाना तात्काळ निलंबित करा कारण शेतकऱ्याला भयमुक्त वातावरणामध्ये आपला शेतीमाल आपल्याला परवडेल त्याच भावामध्ये योग्य त्या अडत्याकडेच विकला जावा जर तसे झाले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना असे अरेरवी करणाऱ्या व्यापाऱ्यांची दादागिरी खपवून घेणार नाही. स्वाभिमानी स्टाईलने त्या मस्तवाल व्यापाऱ्याला बदडून काढेल होणाऱ्या संपूर्ण परिणामांची जबाबदारी ही प्रशासनाची राहील.

यावेळी उपस्थित कुपवाड शहराध्यक्ष प्रमोद गवंडाचे अमरसिंह देशमुख विजय पाटील धन्यकुमार पाटील प्रशांत नाईक पुरुषोत्तम देशमुख व मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆