====================================
====================================
कुंडलः दि. 03 जानेवारी 2023
क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सध्या अत्याधुनिक रित्या शेती करुन आपले एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशिल आहे यातून तो ब-याच प्रमाणात यशस्विही झाला आहे. शेतक-यांच्या आर्थीक स्वयंपुर्णतेसाठी क्रांती कारखाना सर्वती मदत करणेस बांधील आहे असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले.
ते कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत वसंतदादा साखर केंद्र पुणे येथे आयोजित ज्ञानयागसाठी 41 पुरुष शेतकरी ऊस लागवड प्रशिक्षणासाठी पाठविणेत आले यावेळी ते बोलत होते. हे प्रशिक्षण 5 दिवसांसाठी आयोजित केले आहे.
कारखान्यामार्फत एकरी ऊस उत्पादन वाढावे म्हणून अनेक ऊस विकास योजना राबविल्या जातात. यामध्ये सुधारित ऊस जातीचे बियाणे, रासायनिक खते, सुक्ष्म खते, जिवाणू औषधे यांचा पुरवठा केला जातो. बांधपोहोच बिनव्याजी कंपोष्ट खत पुरवठा केले जाते. याशिवाय कारखानासाईटवर सुसज्ज अशी ऊस रोप वाटीका असून यामधून प्लास्टीक ट्रे मधील तयार ऊस रोपे पुरवठा केली जातात. लागवडीमधील मजूर खर्चासाठी रोख रकमेचे अर्थसहाय्य केले जाते. या विविध उपक्रमामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकाचे एकरी उत्पादन वाढले आहे. ऊसविकास योजना राबविणे बरोबरच कार्यक्षेत्रातील शेतकरी ऊस लागवड तंत्रज्ञानाने प्रशिक्षीत व्हावा म्हणून कारखान्यामार्फत पुरुष शेतक-यांना प्रशिक्षणासाठी दरवर्षी वसंतदादा साखर संस्था पुणे येथे पाठविले जाते. या प्रशिक्षणामूळे अधीक रुंद सरीमध्ये ऊस लागण, लागणीसाठी कमीतकमी बियाणे वापर, ऊसाची पाचट शेती यामध्ये कार्यक्षेत्रात अधीक गती मिळाली आहे.
यावेळी कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, रणजित लाड, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, विक्रांत लाड प्रशिक्षणार्थी शेतकरी, कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
क्रांती कारखान्याचे शेतकरी वसंतदादा साखर संस्था येथे प्रशिक्षणासाठी रवाना करताना आमदार अरुणअण्णा लाड.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆