BANNER

The Janshakti News

पलूस व आंधळी येथे 'जागतिक दिव्यांग दिन' उत्साहात संपन्न..



=====================================


=====================================

पलूस | दि. ०४ डिसेंबर २०२२

  पलुस  येथे दि. 3 डिसेबर 2022 रोजी कृष्णाकाठ दिव्यांग संस्था व दिव्यांग काँग्रेस सांगली याच्या सयुक्त विद्यमानाने पलुस तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते व मार्गदर्शक मा.ऋषिकेश दादा लाड याच्या उपस्थितीत  राजु खोडवे जिल्हाध्यक्ष दिव्यांग काँग्रेस सेल याच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेस नेते  बाळासाहेब रकटे , विवेकानंद दिव्यागं फौडेशन चे सदस्य  संतोष सावंत ,  ब्रम्हा बनसोडे,कृष्णा वेरळा सुतगिरणी चे एम डी मा.दिवटे साहेब व सर्व अधिकारी वर्ग, पलुस, बाबवडे,वसगडे, राडेवाडी, नागठाणे, भिलवडी ,खडोबाचीवाडी, आंधळी, धनगाव साडगेवाडी इत्यादी गावचे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वाच्या उपस्थितीत संपन्न झाला.



दरम्यान
आंधळी हायस्कूलमध्ये देखील 'जागतिक दिव्यांग दिन' उत्साहात संपन्न.
  श्री.दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीमध्ये आस्था केंद्राच्यावतीने 'जागतिक दिव्यांग दिन' उत्साहात संपन्न झाला.त्यानिमित्त दिव्यांग पालक व विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.




यावेळी आस्था केंद्राच्या प्रमुख शुक्राना शिकलगार, संतोष सावंत,गणेश जाधव, मुख्याध्यापक जयवंत मोहिते,ए.ए.पाटील, यु.एस.गुरव, डी.व्ही.बंडगर, एस.पी.पाटील, एस.एस.कांबळे, डी.सी.चौधरी आदी मान्यवर, शिक्षक, पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे  स्वागत व प्रास्ताविक एम.एन.माने व आभार आर.आर.गायकवाड यांनी मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆