BANNER

The Janshakti News

....... गावाकडची गोष्ट........। ....ऐक टरक भरून लग्न वराड.....। ... दत्तात्रय पांडुरंग मानुगडे, उर्फदतामा..।



======================================
==============================




       ....... गावाकडची गोष्ट........।
....ऐक टरक भरून लग्न वराड.....।
... दत्तात्रय पांडुरंग मानुगडे, उर्फदतामा..।

लग्नसराईचे दिवस चालू होते एका एका मुहूर्ताला बरिच लग्न लागत होती. ग्रामीण भागातील लग्नाचा घोळ फार भयानक असतो एकदा का मुला-मुलींची लग्नं ठरली म्हणजे एक विचाराचा महापूर असतो. तो लग्नातील गोंगाट मानसे किंवा बायका यांच्या शब्दाचा गोंगाट ते काय बोलतात हे समजत नव्हते. इतका हा विपुल असा गोंगाट कोण कुठे आहे व काय बोलत आहे हे समजणे अतिशय अवघड. लग्न घाई ही अतिशय गडबडीची असते कपड्यांची खरेदी बडाम करण्याची तयारी लग्नामध्ये काय करायचं कोणता पदार्थ करायचा. याची चर्चा भरपूर वेळ चालत होती त्यात भडजीची गडबड. पाहुण्यांचा पाहुणचार बँड वाल्यांची गडबड शा सार्‍या गडबडी मी नेहमी पहात होतो. पूर्वी म्हणजे आमच्या वेळी पाच दिवस लग्न सोहळा चालत होता. घर भरून लग्नासाठी जमा झालेली माणसे. व त्या माणसांच्या बायका यांच्या विचाराला त्यावेळी बंधन घालणारे अतिशय कमी होते. पूर्वीच्या चालीरूढी प्रमाणे जुन्या विचारांची माणसे वागत होती व लग्नकार्य पूर्ण करून आपल्या घरी जात होती. लग्न म्हणजे पती-पत्नीच्या दोन जीवाचे मिलन संसाराला नवीन सुरुवात आणि बायको केलेला शिक्का. तो ही ब्राह्मणांच्या साक्षीने अंगावर पडलेल्या अक्षदा एक जाणीव व माणसासमोर झालेला लग्न सोहळा एक आठवण. हे जरी एका अर्थाने खरे असले तरी मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला मोठे करायचे तिला शिक्षण द्यायचे. तिचे लाड पुरवायचे तिच्या आई-वडिलांनी तिच्यावर प्रेम करायचे. लहाना ची मुलगी मोठी करायची आणि दुसऱ्याच्या घरी पाठवायची. ब्राह्मणांच्या साक्षीने नवरा नवरी च्या अंगावर चार तांदूळ पडले की. मुलीच्या वडीलाचे नाव जाऊन तिच्या नवऱ्याचे नाव येते हे कितपत खरे आहे...।
... हे शास्त्र कधीपासून चालू आहे आणि आत्तापर्यंत सुद्धा चालू आहे. बापाचे नाव जाऊन तिच्या नवऱ्याचे नाव लागावे हा तसा ठोस पुरावा कुठेही नाही. तरी परंतु आज आखेर या विषयाचा घोळ अजून पर्यंत समजला नाही आणि समजणार सुद्धा नाही. आमच्या गावा मध्ये लग्नसराईचे दिवस होते आमच्या भाव कितील एका मुलाचे लग्न ठरले होते. आणि आई मला म्हणाली.
,, तुला आज रेल्वेची सुट्टी आहे काय..।
,, होय मी म्हणालो..।
,, मग आज तूटरक मधून लग्नाला जा. कारण आपल्या भावकीतील लग्न आहे आपल्या घरातील एक माणूस जायला हवा. मी आज शेतात कामाला जात आहे नाहीतर तुला सुट्टी नसती तर मीच गेले असते.. आई म्हणाली..।
,, मी आई-वडिलांना फार मानतो मी आईला म्हणालो तू काळजी करू नको मी लग्नाला जातो असे मी म्हणालो..।
,, ठीक आहे मी शिंदे यांच्या मळ्यात कामाला जाते तू लग्नाला जा आई म्हणाली..।
मी आईचे ऐकून भावकी मध्ये लग्न दारात पोहोचलो एक टरक मानसे व बायका यांनीटरक एकदम फुल भरला होता. आता मला कुठे जागा मिळते याचा शोध मी घेत होतो शेवटी आमच्या भाव कितील एका माणसाने मला उचलून ट्रक मध्ये घातले. मी कसातरी एका बाजूला उभे राहून मुलींच्या गावी प्रवास करू लागलो. प्रवास चालू असताना या ट्रक बरोबर झाडे सुद्धा आमच्या बरोबर येत आहेत असा मला भास होत होता. या भरलेल्या माणसांच्या ट्रक मधून अंगाला झोंबत असलेला गार वारा माझ्या मनाला एक प्रकारचा आल्हाद देत होता. वाहन पुढे पुढे जात होती व माझ्या डोळ्याची तरळ दृष्टी पुढे काय येते याची उत्सुकता वाटत होती. काही वेळातच एका ग्रामीण खेड्यात हा ट्रक मराठी शाळे जवळ जाऊन थांबला. काही वेळातच बॅंडवाले व मुलीकडील पाहुणे पांढऱ्या शुभ्र पोषाखा मध्ये मला दिसू लागले. त्यापैकी एका माणसाच्या खांद्यावर पाण्याने भरलेली घागर हो मला दिसत होती. बेडा मध्ये गाणे लावले होते ते मला स्पष्ट ऐकावयास येत होते. पाहुणचार करायला आलेली माणसे आमच्या ट्रक जवळ येऊन थांबले. तोपर्यंत आमच्या ट्रक मधील माणसे ट्रक मधून खाली उतरले. मुलीकडच्या पाहुण्याने आमच्या ट्रक समोर पाण्याची घागर ओतली. व प्रत्येक जण टॉवेल टोपी तोंडामध्ये साखर घेऊ लागले...।
... ही पाहुण्यांची नवीन ओळख होती नवीन पाहुण्यांना गळाभेट घेऊन नवीन नाते निर्माण होत होते असे माझ्या मनाला वाटत होते. मुलाकडच्या पाहुण्यांना टॉवेल टोपी कपाळी कुंकवाचा गंध व श्रीफळ देऊन चांगला सत्कार करण्यात आला होता. आमचा वराडा ने भरलेला ट्रक पुढे पुढे जात होता काही वेळातच मुलीच्या मंडपामध्ये आम्ही पोहोचलो. आमच्या वराडा ला एक जानवस दिले होते त्या जाणवस घरासमोर पाहुण्यांनी पाहुणचार करण्यासाठी चार घागरी लिंबू सरबत केला होता. आम्ही सर्वांनी लिंबू सरबत घेतला सरबत गार असल्यामुळे आमच्या गावची काही मंडळी डबल सरबत पिऊ लागले. माझा चुलता याला गार सरबत पिण्याची फार सवय होती. तो इकडून तिकडे यायचा आणि पाहुण्यांना म्हणायचा पाहुणं भरा ग्लास. असा तू उन्हाचा कडाका पाहून 21 ग्लास त्यादिवशी सरबत प्याला. हे मी डोळ्याने पाहत होतो ग्रामीण भागातील लोकांची एक सवय ती म्हणजे एकांदे पेय नवीन असली की फार आनंद होतो .तसा आनंद माझ्या चुल त्याला झाला होता माणसांची गडबड असल्यामुळे कोणी कोणाकडे बघायच तयार नव्हते. सरबत वाटणारा माणूस एकदम गडबडीत होता जो माणूस सरबत प्यायला येईल त्याला तो लिंबू सरबत देत होता.. अशी ही ग्रामीण भाग ची माणसे यांचे वर्णन काय करावे मला काही वेळा शब्द सुचत नाहीत. तरीपण हा शब्दप्रपंच हल्ली असा भरलेला वऱ्हाडाचा ट्रक दिसत नाही हीच खरी खंत आहे. या ट्रकमध्ये वराडी लोकांच्या चर्चा अजून कानावरून जातात तो एक आनंद वेगळा होता पण हल्ली तर एकच दिवसात लग्न होते एवढे मात्र निश्चित..।
... पूर्णविराम...।

.. दत्तात्रय मानुगडे.
,, राष्ट्रीय उपाध्यक्ष,,
अखिल भारतीय साहित्य परिवर्तन शाखा तासगाव.
ग्रामीण कथा लेखक .

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


    

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆