=====================================
=====================================
भिलवडी | दि.२४ नोव्हेंबर २०२२
सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुनीता चितळे यांनी ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेस दोन लाख रुपये देणगी दिली.सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी देणगीचा धनादेशाचा स्विकार केला. वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांचे हस्ते शाल श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सुनिता चितळे म्हणाल्या की,सासूबाईनी देणगी देण्याची प्रेरणा
मिळाली. पती स्वर्गीय काकासाहेब चितळे यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याला आर्थिक मदत देण्याचा आदर्श निर्माण केला आहे.आम्ही सुरुवातीला महिलांची पुस्तक भिशी सुरू केली त्यातून वाचनाची आवड निर्माण झाली.तरुण मुलामुलींना वाचनाची गोडी लागावी यासाठी वाचनालयात सुसज्ज व अद्ययावत अभ्यासिका उभारण्यासाठी
या निधीचा विनियोग करण्यात यावा.
सार्वजनिक वाचनालयाचे जडणघडणीत चितळे उद्योग समूह व परिवाराचे अनमोल असे सहकार्य लाभत असून वाचनालयाच्या आजवरच्या इतिहासात ही सर्वाधिक मोठी देणगी असल्याचे मनोगत सुभाष कवडे यांनी व्यक्त केले.
संचालक डी.आर.कदम यांनी आभार मानले.यावेळी उद्योजक मकरंद चितळे,जयंत केळकर,हणमंतराव डिसले, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆