BANNER

The Janshakti News

नयना सोनवणे यांचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्काराने गौरव ... मनुष्यबळ अकादमीतर्फे गुणिजन गौरव महासंमेलन पुणे येथे प्रदान..


 

=====================================
 
 
=====================================

जत | दि. २३ नोव्हेंबर २०२२

मनुश्री महिला बहुउद्देशीय विकास संस्था जत च्या संस्थापक सचिव नयना भास्कर सोनवणे यांचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या राज्यस्तरीय गुणगौरव महासंमेलन आयोजित 'राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार 2022' या पुरस्कारा ने पुणे येथे सन्मानित करण्यात आले.पुरस्कार प्रेरणा देतात ; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ! या विचारसूत्रावर गेली 22 वर्षे कार्यरत या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या गुणिजन गौरव महासंमेलन 2022 उपक्रमातील पुरस्कार सुप्रसिद्ध विचारवंत ह भ प माननीय श्यामसुंदर महाराज सोन्नर, तज्ञमार्गदर्शक सौ.मोनिका यशोध व सुप्रसिद्ध समाजसेवक तात्यासाहेब रसाळ याच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

 

सौ.नयना सोनवणे यांनी मनुश्री महिला बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले बालकामगार शाळेतील मुलांना युनिफॉर्मचे वाटप , मूकबधिर व मतिमंद शाळेतील शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके पेन खाऊ वाटप महिलांना मार्गदर्शन शिबिर, गरजू महिलांना साहित्याचे वाटप केले. केरळ येथील झालेल्या भूकंपामध्ये व सांगली,कोल्हापूर महापुराच्या वेळी संस्थेच्या वतीने निधी संकलन करून भूकंपग्रस्थाना व पूरग्रस्थाना मदत करण्यात आली. दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त गरीब व गरजू महिलांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते.त्याचबरोबर समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करून आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांना कै. पंडित गोपाळ कोरे यांचे स्मरणार्थ सौ नम्रता सूर्यवंशी मॅडम यांच्यातर्फे "महिला कर्तुत्व सन्मान" हा पुरस्कार देण्यात येतो.

         

संस्थेचा प्रथम पुरस्कार सुप्रसिद्ध निवेदिका सौ वनिता घाडगे- देसाई मॅडम यांना देण्यात आला.याच बरोबर त्यांनी महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी एमआयडीसी जत मध्ये एन.एस.प्रोडक्ट नावाने स्वतःचा उद्योग सुरू केला असून महिलांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे.यापूर्वी नयना सोनवणे यांचा सुरेश शिंदे प्रतिष्ठान जत चा 2018 साली 'आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' ,2021 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या जत शाखेचा 'नारीशक्ती गौरव पुरस्कार ' व 2022 साली 'शिवकृपा पतसंस्था सन्मान 2022' या पुरस्काराने गौरव केला आहे.

    

यावेळी संस्थाअध्यक्ष भावना कोळी,उपाध्यक्ष नम्रता सूर्यवंशी, सहसचिव प्रमिला साळुंखे ,खजिनदार राजक्का शिंदे, नीलम थोरात, विमल जाधव ,भास्कर सोनवणे सर,नेताजी शिंदेसर,श्री.राहूल सोनवणे. यांचे सहज सर्व नातेवाईक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

       


        

   

 

 

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆