BANNER

The Janshakti News

पलूस कडेगांव मतदारसंघातील कोणत्याही गावात विकासाच्या बाबतीत मी कमी पडलो नाही. आणि कमी पडणारही नाही. विकासाच्या बाबतीत मी नेहमीच अग्रेसर राहीन..डॉ. विश्वजित कदम




=====================================

=====================================

भिलवडी | दि. ०६ नोव्हेंबर २०२२

पलूस कडेगांव मतदारसंघातील कोणत्याही गावात विकासाच्या बाबतीत मी कमी पडलो नाही. आणि कमी पडणारही नाही. विकासाच्या बाबतीत मी नेहमीच अग्रेसर राहीन असे प्रतिपादन माजी मंत्री आ.डॉ.विश्वजित कदम यांनी केले.


पलूस तालुक्यातील खटाव, ब्रम्हनाळ, वसगडे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड प्रमुख उपस्थित होते.
माजी मंत्री आ.डॉ.विश्वजित कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांच्या शुभहस्ते खटाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये दरकास चौक ते एमएसईबी रस्ता २५:१५ योजनेतून डांबरीकरण करणे. रक्कम - १० लाख


रणजीत नागावे घर ते गावकमान बंदिस्त गटार जनसुविधा योजनेतून करणे.
रक्कम - ५ लाख, नळ पाणीपुरवठा योजना करणे. २७ लाख रुपये,
ब्रम्हनाळ रस्ता-अशोक कर्नाळे वस्ती ते तानाजी कर्नाळे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे. आमदार फंडातून
१० लाख या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच नीलावती गुरव, ओंकार पाटील, रवींद्र काळे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


ब्रम्हनाळ येथे ग्रामसचिवालयाचे उद्घाटन डॉ. विश्वजित कदम व महेंद्र लाड यांच्याहस्ते करण्यात आले. यांसह ओढ्यावर साकव बांधणे रक्कम ६६ लाख, निरंजन बंडगर घर ते मोहन गावडे वखार रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख, सावकर ओढ्यावर लहान पूल बांधणे १ कोटी ३५ लाख, ब्रह्मनाळ, सुखवाडी, चोपडेवाडी, भिलवडी रस्ता डांबरीकरण करणे - ३ कोटी ५० लाख या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी सरपंच उत्तम बंडगर, प्रल्हाद घडले, वैभव मद्वाण्णा यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
दरम्यान वसगडे ता.पलूस येथील तलाठी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमोल पाटील, अनिल पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ.कदम यांचा
विकासकामांचा धडाका चालू असून मतदारसंघात उत्साह प्राप्त झाला आहे.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆