BANNER

The Janshakti News

प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांची निवड., सर्व स्तरातून होतेय अभिनंदन.

====================================


====================================

इस्लामपूर | दि.०५ नोव्हेंबर २०२२
 
प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी श्री चंद्रशेखर बाळासो क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील पत्र राज्याध्यक्ष श्री  संतोष राजगुरु यांनी जाहीर केले आहे.या पत्रात असे म्हंटले आहे की  आपली नियुक्ती ही संघटनेच्या ध्येय धोरणास कटीबध्द असून आपण आपल्या पदाची प्रामाणिक वाटचाल करुन संघटनेचे व  आमदार बच्चु कडू यांचे विचार तळागाळापर्यंत न्याल हा विश्वास वाटतो.आपल्या नियुक्तीने शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आपली नियुक्ती ही संघटनेच्या ध्येय धोरणांना कटीबध्द राहून संघटनेची कीर्ती वाढवावी असे काम करावे असेही त्यात म्हंटले आहे. 


याबाबत प्रतिक्रिया देताना श्री चंद्रशेखर क्षीरसागर म्हणाले की, सांगली जिल्ह्यात शिक्षक भारती उभी करताना रक्ताचे पाणी करून काम केले. त्याच ताकतीने व नव्या जोमाने आमदार  बच्चू कडू यांच्या विचाराने व राज्याध्यक्ष श्री संतोष राजगुरु यांच्या मार्गदर्शनात सांगली जिल्ह्यात प्रहार संघटना उभी करू  असे प्रामाणिक वाटते.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆