=====================================
=====================================
कुंडल | दि. ३० नोव्हेंबर २०२२
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त दि. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर रोजी व्याख्यानमालेचे आयोजन करणेत आले आहे. हि व्याख्यानमाला कुंडल (ता.पलूस) येथील ग्रामपंचायतीच्या समोरील पटांगणावर संध्याकाळी 6 वाजता होणार असल्याची माहिती क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड जन्मशताब्दी समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते.
या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफणेसाठी गुरुवार दि. 1 डिसेंबर रोजी कवी अरुण म्हात्रे व डॉ संगीता बर्वे यांचे '' कवितेच्या काठावरून'' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
दुसरे पुष्प गुंफण्यासाठी शुक्रवार (दि.2) रोजी शरद तांदळे यांचे '' मी उद्योजक '' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तर तिसरे पुष्प गुंफण्यासाठी शनिवार (दि.3) रोजी जेष्ठ पत्रकार, संजय आवटे यांचे '' भारताची गोष्ट '' या विषयावर व्याख्यान होणार आहेत.
तर रविवार (दि.4) रोजी क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. दि. 4 रोजी सकाळी क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या, क्रांती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील समाधीस अभिवादन करण्यात येणार आहे.
तरी या व्याख्यान मालेसाठी आणि अभिवादनासाठी परिसरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड जन्मशताब्दी समिती, क्रांतिअग्रणी विचार व कार्यशक्ती, क्रांती उद्योग समुह यांचे वतीने करणेत आले आहे.
यावेळी अशोक पवार, मुकुंद जोशी, अनिल लाड, श्रीकांत लाड, वसंत लाड, जगन्नाथ आवटे,माजी उप सभापती अरुण पवार, संजय मदने, पंजाब पवार, यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆