BANNER

The Janshakti News

पनवेलचा गावगुंड जगदीश गायकवाडला तात्काळ अटक करा..... वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा दक्षिणच्यावतीने सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे लेखी तक्रार...=====================================
=====================================

सांगली.दि.29 नोव्हेंबर 2022

वंचित बहुजन आघाडीचे सर्वस्व माननीय श्रद्धा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जगदीश गायकवाड या गुंड व समाज विघातक प्रवृत्तीच्या व अनेक गुन्हेगारी केसेस असलेल्या व्यक्तीने अतिशय जहरी आणि नीच पातळीवर जाऊन आंबेडकर कुटुंबा बाबत गरळ ओकली आहे. जगदीश गायकवाड या इसमाने फेसबुक वरती अतिशय घाणेरड्या प्रकारचे शिवीगाळी करून तमाम आंबेडकर प्रेमी व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मन दुखावण्याचा घाणेरडा प्रकार करून आंबेडकर घराण्यावरती चिखल फेक करण्याचा काम या नालायक गुंड प्रवृत्तीच्या जगदीश गायकवाड ने केले असून त्याच्या विरोधात,भारतीय दंड विधान संहिता 1860 च्या कलम 500,501,505(2)b, 153A, 504 व 506(part 2) कलमा गुन्हे दाखल करून या समाज घातक माणसावर कडक कायदेशीर कारवाई करून ताबडतोब अटक करावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील.


असे निवेदन पोलीस अधीक्षक सांगली यांना देण्यात आले त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष दक्षिण चे महाविर तात्या कांबळे, जिल्हा महासचिव राजू मुलांनी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, जिल्हा सल्लागार गौतम लोटे, राकेश कांबळे सतीश कांबळे, सागर आठवले, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆