BANNER

The Janshakti News

कर्तव्यात कसूर करणाऱ्या वनविभागातील कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.............अमरजित कांबळे उप वनरक्षक (प्रा) सांगली यांना दिले निवेदन..

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}





{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

=====================================



=====================================

भिलवडी | दि. 09 ऑक्टोबर 2022

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ.गट) पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजित कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार भिलवडी ( ता. पलूस ) येथील दत्तनगर भागामध्ये २८ सप्टेंबर २०२२ रोजी एक माकड जखमी अवस्थेमध्ये आढळून आले. त्याच्या पाठीवर व पायाला काहीतरी लागल्यामुळे जखम झालेली होती त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हते. या घटने बाबतची माहिती भिलवडीतील काही पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी वनविभाग कर्मचारी शहाजी ठवरे यांना दिली होती. जखमी माकडावर ताबडतोब उपचार व्हावेत म्हणून, प्राथमिक उपचार करण्यात आले संबंधित माकडाला पुढील उपचार करणे कामी घेऊन जाण्यासाठी वारंवार फोन करूनही ठवरे यांनी आता येतो, परत येतो असे म्हणून येण्यास टाळाटाळ केली. दुसऱ्या दिवशी ( सकाळी ) देखील जखमी माकड पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला फोन केले परंतु त्यांनी फोन उचलला नाही. हे जखमी माकड अखेर मृत्युमुखी पडले. त्यानंतर ग्रामपंचायत कामगारांच्या मदतीने रितसर त्या माकडाचा अंत्यविधी करण्यात आला. हा सर्व प्रकार घडल्यानंतर वनविभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.तोपर्यंत सर्व सोपस्कार झाले होते.याबाबत कडेगावच्या अधिकारी चव्हाण मॅडम यांना, स्वतः अमरजित कांबळे यांनी फोन द्वारे संपर्क साधला असता, कोणत्याही प्रकारची समाधानकारक उत्तरे न देता, फोन कट केला.

तरी सदर प्रकारची आपण खोलवर जाऊन चौकशी करावी व जे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा अनुचित प्रकार घडलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.



कारण की असा एखादा अनुचित प्रकार सर्वसामान्य माणसाकडून घडला असता तर आपल्या खात्याने त्यांच्यावरती कारवाई केली असती. भिलवडी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी फोन केल्यानंतर संबंधित घटनेचे गांभीर्य ओळखून सदर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असते तर कदाचित त्या माकडाचा जीव वाचला असता. त्यामुळे संबंधित दोषींना कोणतीही दयामाया न दाखवता योग्य ती कारवाई करावी. तसेच कोणत्या स्वरूपात कारवाई करण्यात आली याबाबत आम्हांला लेखी कळवावे अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.गट) पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजित कांबळे यांनी दि.०७/१०/२०२२ रोजी उप वनरक्षक (प्रा) सांगली यांना दिले आहे.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆