BANNER

The Janshakti News

बेकायदेशीररित्या साठवणूक करण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांची चौकशी करा.. मनसेची तहसीलदार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी..=====================================


=====================================

पलूस | दि. २१ ऑक्टोबर २०२२

मनसेचे पलूस तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,मौजे खंडोबाचीवाडी ता.पलूस येथील बसंत अँग्रोटेक या खत कारखान्याच्या हद्दीमध्ये दि. १४/१०/२०२२ रोजी MH 50 N3400 या वाहतूक वाहनाद्वारे बाहेरून आणलेल्या मातीचा साठा करण्यात येत होता. बेकायदेशीर माती साठा होत असल्याची माहिती मनसेचे तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे यांना समजताच त्यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी जाऊन साठा करण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांचे मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटिंग केले. 


 कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या हद्दीत केलेल्या मातीसाठ्या संदर्भात मनसे पदाधिकारी यांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी तात्काळ खंडोबाचीवाडी येथील तलाठी यांच्याशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली. भिलवडीचे सर्कल व तलाठी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन बसंत ॲग्रोटेक , खत कारखान्याच्या आवारात बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या माती साठ्याचा पंचनामा केला. परंतु महसूल विभागा कडून आद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

     
  भिलवडी ते पाचवामैल जाणाऱ्या राज्यमार्गाचे रस्ता रुंदीकरण काम सुरू आहे. सदर रस्त्याची उखरलेली माती विक्री केली जात असल्याची चर्चा परिसरातील नागरीकांमधून होत आहे.

या अनुषंगाने मौजे खंडोबाचीवाडी येतील बसंत ॲग्रोटेक ,खत कारखान्याच्या हद्दीत केलेल्या बेकायदेशीर माती साठ्याची चौकशी करुन संबधितावर योग्य ती कारवाई करावी  
 अशा आशेयाच्या लेखी पत्राद्वारे मागणी  महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते आस्थापना तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी    पलूसचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.


यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव, तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆