BANNER

The Janshakti News

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा..अन्यथा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही.. महेश खराडे



=====================================


=====================================

आटपाडी | दि. २२ ऑक्टोबर २०२२

 गतवर्षीचे २२३ रुपये तातडीने द्यावेत, चालू वर्षाची एफ आर पी एक रकमी जाहीर करावी यासह अन्य मागण्यासाठी आटपाडी तालुक्यातील सद्गुरू रविशंकर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.  यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धूमचक्री झाली मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.


जिल्हाध्यक्ष महेश खराडे तालुकाध्यक्ष विजय माने तानाजी सागर विठ्ठल मोरे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल सचिन पाटील अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी मोर्चा काढण्यात आला. राजेवाडी मुख्य चौकातून मोर्चास प्रारंभ झाला एकच गट्टी राजू शेट्टी , ऊस बिल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक रकमी एफ आर पी मिळालीच पाहिजे, कुणचा म्हणतोय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही अशा घोषणा देत मोर्चा कारखाना गेट वर आला. त्या ठिकाणी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस आणि कार्य कर्त्यांच्या मध्ये जोरदार धुमच्क्री झाली शेतकऱ्यांनी गेट वरच  ठिय्या मारला या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. 


आंदोलकां समोर बोलताना जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले गतवर्षी कारखान्याने २६६० रुपये देण्याचे जाहीर केले मात्र प्रत्यक्षात २४३७ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना बिले दिली अद्याप २२३ रुपये बाकी आहेत ती रक्कम तातडीने द्यावी त्याच बरोबर एक रकमी एफ आर पी जाहीर करावी  वजनातील काटामारी थांबवावी, तोडायला द्याव्या लागणाऱ्या पैशाची पद्धत बंद करावी , जर मजुरांना पैसे द्यावे लागत असतील तर कारखान्याने तोडणीचे पैसे कपात करू नयेत ,  रीकवरी चोरी थांबवावी , वजनकाटा आणि रिकवरी लॅब ऑनलाईन करावेत आदी मागण्या मान्य न झाल्यास  धुरडे पेटू देणार नाही असा इशारा दिला. 


त्यानंतर कारखान्याचे उपाध्यक्ष करणविर पाटील आंदोलनस्थळी आले त्यांनी आमचा काटा व्यवस्थित असून शेतकऱ्यांनी कुठेही वजन करून आणावे आमची कोणतीही हरकत असणार नाही अशी ग्वाही दिली. गतवर्षी चे २२३ रुपये तसेच या  वर्षीची एक रकमी एफ आर पी बाबत संचालक मंडळाशी चर्चा करून निर्णय घेवू असे सांगितले त्याच बरोबर तोडायला द्याव्या लागणाऱ्या पैशा बाबत ही योग्य निर्णय घेवू तोडनीचे पैसे मुकादम घेणार नाहीत  अशी व्यवस्था करू अशी ग्वाही दिली यावेळी नंदकुमार माने, ईश्वर माने, संदीप शिरोटे, सागर शिरोटे, सुरेश पाचोब्रे, अजित कोडग, शिवराज गायकवाड, मदन जाधव, दत्ता भोसले, आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●




●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆