BANNER

The Janshakti News

महावितरणमध्ये तन,मन, धनाने प्रामाणिक सेवा देणाऱ्या संजय चव्हाण यांचा कामावर कार्यरत असताना बळी गेला. अशा या प्रामाणिक कर्मचाऱ्याला शासन न्याय देणार का ? ॲड. दिपक लाड.


 

पिडीत कुटुंबाला तातडीने मदत करा...ॲड दिपक लाड
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇




======================================


======================================

तासगाव | दि. २७ ऑक्टोबर २०२२

येळावी ता.तासगाव येथील येथील महावितरण कर्मचारी संजय चव्हाण यांचा गोंदीलवाडी येथे वीज सेवा सुरळीत करत असताना दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे, आज त्यांच्या कुटुंबीयांचे दुःखद सांत्वन करणे प्रसंगी कुटुंबीयांची भेट घेतली... शेतकऱ्यांचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी साहेबांनी या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला कुटुंबीयांचे दुःखद सांत्वन केले व कुटुंबीयांना तात्काळ न्याय मिळवून देणार असल्याचे कळविले..




महावितरण चे कर्मचारी संजय चव्हाण वीज ग्राहकांना सेवा देत असताना त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल व त्यांच्या माणुसकी व मानवते बद्दल चव्हाण कुटुंबीयांकडून त्यांच्या आठवणी एकत असताना  गहिवरून आले.

स्वतःची म्हैस विकून संजय चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे वीज बिल भरले

एन उन्हाळ्याच्या काळात बिल न भरलेल्या वीज ग्राहकांची वीज कट करण्याची कारवाईची मोहीम महावितरण कडून चालू होती,

 वायरमन चव्हाण सेवा देत असलेल्या विभागातील वसुलीचा भार चव्हाण यांच्यावर होता..

 अशा काळात संजय चव्हाण सेवा देत असलेल्या विभागातील अनेक शेतकऱ्यांची वीज 
वीज बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन तुटणार होती, 

परंतु शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीची जाण चव्हाण यांना असल्या कारणाने, एन उन्हाळ्यात शेतकऱ्यांची हाता तोंडाला आलेली पिके वाया जाऊ नये याकरिता, 
वीज सेवक चव्हाण यांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य असताना देखील  घरची म्हैस विकून आलेले 65 हजार रुपये शेतकऱ्यांच्या वीज बिलासाठी स्वतःच्या खिशातून भरलेले आहेत. अशी दानत दाखवून माणुसकीचे सर्वात मोठे उदाहरण व माणुसकीचे दर्शन वीज वितरण सेवक संजय चव्हाण यांच्या रूपाने दिसले आहे.

महावितरण कंपनी व सरकारकडून चव्हाण कुटुंबीयांना मोठ्या अपेक्षा आहेत व अपेक्षा असणे सहजीक आहे कारण घरातील कर्ता पुरुष अकाली गेल्याने घराची काय अवस्था होते हे आपणा सर्वांना माहित आहे.

 मुलीच्या लग्नासाठी संजय चव्हाण जुळवा जुळवा करत होते, मुलगा आशुतोष वडिलांना व कुटुंबाला  हातभार म्हणून कॉलेजचे शिक्षण घेत पुणे येथे सिक्युरिटी गार्ड कंपनीत नोकरी करतोय, त्याच्या भवितव्याची फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे...


संजय चव्हाण यांची नोकरी सोडली तर घरी उदरनिर्वाहासाठी कसलीही तजवीज किंवा उदरनिर्वाहासाठी शेतजमीन नाही.
पतीच्या अकाली जाण्याने संजय चव्हाण यांच्या पत्नींना फार मोठा दुःखाचा आघात झाला आहे, संजय चव्हाण यांच्या आई वयस्कर झाल्या आहेत वयोमानानुसार त्यांनाही 
दुःख पचवणे सहनशीलतेच्या पलीकडे आहे...

संजय चव्हाण यांनी आयुष्यातील सर्वात जास्त काळ तन, मन,धनाने महावितरण कंपनीची प्रामाणिक सेवा केली.

 रात्री अप रात्री अडीच तीन वाजता वीज ग्राहकांचे शेतकऱ्यांचे  जरी फोन आले तरी घरातल्यांच्या बरोबर वाद करून वीज ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी संजय चव्हाण हे आजवर जीवापाड राबले आहेत... हे परिसरातल्या सर्व नागरिकांना ज्ञात आहे.

लाईन फॉल्टी झाल्यावर ग्राहकांना तत्पर सेवा दिली नाही तर ग्राहक फोनवरून उलट सुलट बोलतात शिवीगाळ करतात अशा 
घटनांचा विचार न करता ग्राहकांना तात्काळ सेवा देणे हे कर्तव्य समजून त्यांनी महावितरण कंपनीची आपल्या कार्याने मान उंचावली आहे.

संजय चव्हाण यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला येळावी येथील चव्हाण कुटुंबीयांना महावितरण कंपनीकडून भरीव अशी आर्थिक तात्काळ मदत मिळावी तसेच संजय चव्हाण यांचा मुलगा आशुतोष चव्हाण यांना महावितरण कंपनीने कायमस्वरूपी सन्मानजनक सेवेत घ्यावे... अन्यथा महावितरणच्या विरोधात जनरोष निर्माण होईल व न्यायालिन व रस्त्यावरची लढाई  उभा करू
यामध्ये सत्याचा विजय होईल

घरी अठरा विश्व दारिद्र्य असताना खिशातले 65 हजार रुपये भरून शेतकऱ्यांचे वीज बिल भरणारा मोठ्या मनाचा योद्धा संजय चव्हाण सेवा देत असताना दुर्दैवी मृत्यू पावले,आज ते  हयात नाहीत... 

चव्हाण कुटुंबीयांचे पुढील भवितव्य सुरक्षित करण्यासाठी तसेच त्यांचा मुलगा आशुतोष याच्या तात्काळ नोकरीसाठी महावितरण व महाराष्ट्र शासनाने मोठ मन दाखवावं हीच खरी वेळ आहे आणि याकडे सर्व समाज मोठ्या अपेक्षेने पाहत आहे...

अशी भावना रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल यांच्यावतीने  ॲड दिपक लाड यांनी केली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाबुराव शिंदे, रोहित पाटील, अमर मंगसुळे उपस्थित होते.

¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆