BANNER

The Janshakti News

भिलवडीत सानेगुरुजी संस्कार केंद्रा तर्फे सफाई कामगारांना दिवाळी फराळ व भेट वस्तूंचे वाटप



------------------------------------------------------------------
    

------------------------------------------------------------------     

=====================================


=====================================

भिलवडी | दि. 26 ऑक्टोबर 2022

भिलवडी (ता.पलूस) प्रतिवर्षी प्रमाणे सानेगुरुजी संस्कार केंद्राचे वतीने याहीवर्षी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांना दिवाळी फराळ व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले दिवाळीच्या पहिल्याच दिवशी उद्योगपती गिरीश चितळे यांच्या हस्ते सर्व सफाई कामगारांना दिवाळी फराळ व स्टील डबा भेट म्हणून देण्यात आला व सफाई कामगारांची दिवाळी गोड करणेत आली संस्कार केंद्राचे वतिने गेली बारा वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे 
उपक्रमाचे संयोजक व संस्कार केंद्राचे प्रमुख सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले ते म्हणाले सफाई कामगार हा ग्रामीण भागाच्या गावगाड्याचा महत्वाचा घटक आहे पण हाच घटक उपेक्षित व वंचित राहिला आहे गाव स्वच्छतेची जबाबदारी सफाई कामगार पेलत असतात त्यांना आनंद देणे व विद्यार्थ्यांवर दातृत्वाचा संस्कार रुजविणे हा कार्यक्रमाचा प्रमुख हेतू आहे.

           गिरीश चितळे               सुभाष कवडे
 उद्योगपती गिरीश चितळे यावेळी म्हणाले संस्कार केंद्राने सफाई कामगार यांची दिवाळी गोड करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सामुदायिक स्वच्छता हि महत्वाची असते हे काम सफाई कामगार व्यवस्थित करत असतात.
 यावेळी महिला कामगारांना साड्या भेट देण्यात आल्या सुत्रसंचलन संजय गुरव सर तर बाळासाहेब माने सर यांनी आभार मानले 
दरम्यान फटाके नको पुस्तके वाचू या अभियानात भिलवडी आणि परिसरातील पाचशेहून अधिक विद्यार्थांनी सहभाग घेतला तसेच सवलतीच्या दरातील साधना बालकुमार दिवाळी अंक व अन्य बाल वांग्मयाची पुस्तके विकत घेतल्याचे सुभाष कवडे यांनी सांगितले यावेळी हणमंतराव डिसले,उत्तरभाग सोसायटीचे माजी चेअरमन रमेश पाटील ,के.आर.पाटील,संजय चौगुले व विद्यार्थी उपस्थित होते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆