BANNER

The Janshakti News

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत " आयर्न मॅन " हा किताब पटकाविणाऱ्या यशवंत गुरवचा भिलवडीत सत्कार..




=====================================


=====================================

भिलवडी | दि. २१ ऑगस्ट २०२२

पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी भिलवडी गावचे सुपुत्र यशवंत गुरव याने कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत आयर्न मॅन हा किताब पटकावला. यशवंत गुरवने हा किताब मिळवून भुवनेश्वरवाडी  भिलवडी गावच्याच नव्हे तर देशाच्या नावलौकिकात भर घातली आहे! 
नूर सुलतान (कझाकिस्तान) येथे  १४ ॲागस्ट ला झालेल्या “IRONMAN triathlon” चे आव्हान १३ तास ३३ मिनिटात पूर्ण करून १८ ते २४ वयोगटात तिसरा क्रमांक पटकवला. त्यामुळे “आयर्न मॅन” किताब देऊन गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे जगभर आयर्नमॅन स्पर्धेची क्रीडाविश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. सलग ३.८ कि.मी. खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी १६०० इतर स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहत असलेल्या वाऱ्या विरुद्ध सायकलिंग करणे व लगोलग ४२.२ किमी धावणे ही आव्हाने सलगपणे पूर्ण करायची असतात. हे आव्हान १६ तासाच्या आत पूर्ण करणाऱ्यास “IRONMAN” हा किताब बहाल केला जातो. भारतातून इतर १८० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. यश गुरव यांनी हे आव्हान १३ तास ३३ मिनिटात पूर्ण केले. प्रशिक्षक तसेच मित्र परिवार यांचे मोलाचे मार्गदर्शन, मेहनत, जिद्द, सातत्य, कठोर परिश्रम आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले...


  यशवंतच्या या यशाबद्दल व्यापारी संघटना भिलवडी यांनी त्याचा सत्कार आयोजित केला होता, यावेळी व्यापार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते यशवंत चा सत्कार करण्यात आला,  यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर, उपाध्यक्ष रणजीत पाटील, सचिव राजेंद्र तेली व सहकारी संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम आर पाटील सर यांनी केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆