BANNER

The Janshakti News

वाळव्यात वाल्मीकी रुग्णोपयोगी साहीत्य सेवा केंद्राचा शुभारंभ




=====================================


=====================================

वाळवा | दि. २१ ऑगस्ट २०२२

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती
वाळवा विभागाच्या वतीने रुग्णांना आवश्यक  असे रुग्णसाहीत्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाल्मीकी रुग्णोपयोगी साहीत्यसेवा केंद्र
सुरू करण्यात आले . त्याचा शुभारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वामनराव हर्डीकर , सरपंच डॉ . शुभांगी माळी , उपसरपंच पोपट अहिर,  प्राथमिक आरोग्य  केंद्राचे अधिकारी डॉ . वैभव नायकवडी , उद्योजक व्ही .डी.वाजे , माजी जि.प. सदस्या अलका पुजारी , आदि मान्यवरांच्या उपस्थीतीत करण्यात आला .
समाजातील गोरगरीब , आर्थीक अडचणीतील
रुग्णांना उपचार घेण्यासाठी साहीत्य योग्यवेळी नाममात्रभाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जनकल्याण समितीने हा उपक्रम हाती घेतला आहे , त्यास समितीच्या जिल्हा शाखेने मान्यता दिली असून समाजातील अनेक ऊदार
व्यक्तीमत्वांनी समितीस रुग्णोपयोगी साहीत्य प्रदान केले आहे अशी माहीती जनकल्याण समितीचे प्रमुख दिनकर देवकर, प्रकल्प प्रमुख
अँड . योगेश कुलकर्णी यांनी दिली .


यावेळी जनकल्याण समितीच्या आरोग्य आयामचे श्रीपाद करंदीकर , जिल्हाकार्यवाह नारायण जोशी , कृषी आयामचे दिनकर देवकर यांनी जनकल्याण समितीच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहीती दिली .
कोटभाग येथील देवकर हॉल येथे वाल्मीकी रुग्णसाहित्य सेवा केंद्र कार्यालय सुरू असून गरजु रुग्णांना या केंद्रातून नाममात्रभाडे तत्वा
वर साहीत्य देण्यात येईल त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन दिनकर देवकर यांनी केले आहे 


   प्रकल्प प्रमुख योगेश कुलकर्णी , सेवा विभाग संतोष मगदूम , प्रताप देवकर , दिनकर देवकर, संघाचे कार्यवाह अनिल माने , राजेंद्र तवटे , सचीन शिंदे साहीत्य सेवा केंद्रासाठी परिश्रम घेत आहेत . समितीचे अध्यक्ष राजेंद्र मगदूम ( मेडीकल्स् ) यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर आभार
 संघाचे ॲड.  हृषीकेश हर्डीकर  यांनी मानले



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆