BANNER

The Janshakti News

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर यांच्या पत्नीचे निधन..आज सायंकाळी अंत्यसंस्कार..=====================================


=====================================

विटा,खानापूर | दि. ०३ ऑगस्ट २०२२

विटा, खानापूर, आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिलराव बाबर यांच्या पत्नी सौ. शोभा बाबर (६२) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती आमदार अनिलभाऊ, तसेच माजी नगरसेवक अमोल बाबर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर ही दोन मुले, दीर, जावा, पुतणे असा मोठा परिवार आहे. गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र बुधवारी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खानापूर मतदार संघातील जनतेवर मायेची पाखर घालणाऱ्या काकी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.गेल्या दहा दिवसांपासून शोभाकाकी यांना फुफ्फुसाचा त्रास होत होता. प्रारंभी त्यांना विटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुणे येथिल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर होती. परंतु त्यानंतर यांच्या प्रकृतीत चढ उतार होते. आमदार अनिल बाबर हे शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत. मुलगा अमोल, सुहास आणि स्वतः आमदार अनिल बाबर हे देखील त्यांच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार अनिलभाऊ बाबर यांची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. दरम्यान शोभा काकी यांच्यानिधनाने संपूर्ण खानापूर मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.

आज सायंकाळी अंत्यसंस्कार

सौ शोभा बाबर यांच्यावर आज सायंकाळी विटा आणि गार्डी च्या सीमेवर असलेल्या पवई टेक परिसरातील जीवन प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने खानापूर मतदार संघातील जनतेवर मायेची पाखर घालणाऱ्या काकी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆