BANNER

The Janshakti News

फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपी अखेर जेरबंद...भिलवडी पोलीसांची मोठी कारवाई..


फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपी अखेर जेरबंद...भिलवडी पोलीसांची मोठी कारवाई..

==============================



==============================

भिलवडी | दि.03ऑगस्ट 2022

भिलवडी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे मध्ये टी सी टी टी ई क्लार्क या पदावरती भरती करतो असे सांगुन ग्रामीण भागातील गरीब मुलांची लाखो रुपयांची फसवणुक मोठया प्रमाणात होत होती. त्यानुसार दिनांक 01 / 07 / 2022 रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात किरण महादेव पवार रा. आरग ता. मिरज यांने व त्याचे साथीदार यांनी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचे अमीष दाखवुन ४४ लाख रुपयांची फसवणुक केलेबाबत नागठाणे ता. पलुस येथील मौलाली शौकत मुल्ला व शौकत गुलाब मुल्ला यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भिलवडी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला होता.


या गुन्ह्यांच्या अनुशंगाने भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा तपास करण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार एम एस मोरे यांना आदेश दिले होते. 
त्यांनतर एम एस मोरे यांनी सदर आरोपी चा तपास करणेस सुरुवात केली. गेले एक  महीना त्याचा शोध घेत असता तो मिळुन येत नव्हता. दिनांक 29 / 07 / 2022 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत  आरोपी मौलाली शौकत मुल्ला हा इंडी जिल्हा. विजापुर राज्य कर्नाटक या ठिकाणी असलेबाबत माहीती मिळाली होती. 


त्यानुसार भिलवडी पोलीस ठाणेकडील पोलीस पथक पो. ना. शिवाजी कोकाटे, पो.ना. देवकुळे, पो.ना. कोळी, पो.काँ. खुडे , पो.काँ. मंगेश गुरव , पो.काँ. विशाल पांगे, पो.काँ. गुंडवाडे , पो.काँ. प्रकाश पाटील , या पथकाने  कर्नाटकातील इंडी या ठिकाणी जावुन आरोपीच्या संदर्भात गोपनीय माहीती मिळवुन सदर गुन्ह्यातील आरोपी मौलाली शौकत मुल्ला यास अत्यंत शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. आज दि. 03 ऑगस्ट 2022 रोजी आरोपीला मा. कोर्टात हजर केले असता मा.कोर्टाने आरोपीला दिनांक 06 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.



या गुन्ह्यातील आरोपीकडून आणखीन कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ भिलवडी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी केले आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆







◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆