BANNER

The Janshakti News

जिल्हा परिषद चा कार्यकाळ संपला पण सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांचा काम करण्याचा कार्यकाळ अजून संपला नाही : शरद भाऊ लाड=====================================


=====================================

भिलवडी |  दि.04 ऑगस्ट 2022

       जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर व आमदार अरुण अण्णा लाड यांच्या निधीतून चोपडेवाडी, सुखवाडी ब्राह्मणाळ, खटाव या ठिकाणी 60 लाखाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे गटनेते शरद भाऊ लाड व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या हस्ते करण्यात आला.


 
              यामध्ये चोपडेवाडी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख, बंदिस्त गटर करणे 05 लाख, सुखवाडी येथे बंदिस्त गटर करणे 05 लाख, खटाव येथे रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख अशोक कर्नाळे वस्ती , ब्रम्हनाळ येथे जैन बस्ती समोर अंतर्गत भुयारी गटर बांधने 03 लाख ,रस्ता काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसवणे 10 लाख,ब्राह्मणाळ जिल्हा परिषद शाळा येथे स्वच्छतागृह बांधणे 08 लाख 75000 अशा कामाचा शुभारंभ करण्यात आला            यावेळी सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या सारखा  जिल्हा परिषद सदस्य मिळणं मुश्कील आहे कारण कोणती अपेक्षा न बाळगता सुरेंद्र भैय्या यांनी विकास कामे केली आहेत  आणि जो कामाचा धडाका कसा ठेवला आहे तो खूप मोठा आहे एखाद्या आमदाराला लाजवेल असा निधी सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी जिल्हा परिषद गटामध्ये मिळवून दिला आहे शैक्षणिक विभागासाठी त्यांनी प्रचंड पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला आहे आमचा कार्यकाळ संपला तर सुरेंद्र भैय्यांचा काम करण्याचा काळ अजून संपला नाही असे प्रतिपादन शरद भाऊ लाड यांनी ब्राह्मणाळ येथे बोलताना व्यक्त केला

                यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मोहन पाटील सर,विजय पाटील,व्हा. चेअरमन किशोर महिंद,संचालक उल्लास ऐतवडे, संभाजी महिंद,किशोर तावदर,चव गोंड चिंचवडे, प्रमोद ऐतवडे,चोपडेवाडी गावचे नेते रवी बापू यादव महादेव मोरे, किरण माने ,सुखवाडी येथील अनिकेत जगताप, रमेश यादव ,ब्रम्हनाळ येथील उपसरपंच संजय पाटील, सोसायटी चेअरमन सुहास पाटील, आकाश गावडे ,सुभाष तमा वडेर ,भाऊसो वडेर साद गोंडा पाटील ,शेतकरी नेते संदीप राजोबा अशोक पाटील हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆    

∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆