BANNER

The Janshakti News

वाळवा तालुक्यातील नवेखेड येथील पांडुरंग उर्फ बाजीराव तातोबा जाधव यांचे निधन..=====================================
======================================

इस्लामपुर | दि.२३ ऑगस्ट २०२२

वाळवा तालुक्यातील नवेखेड येथील पांडुरंग उर्फ बाजीराव तातोबा जाधव यांचे निधन..

नवेखेड ( ता.वाळवा ) येथील पांडुरंग उर्फ बाजीराव तातोबा जाधव (वय ६५) हे   औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र पैठण येथे देवदर्शनासाठी गेले होते. पैठण येथील नाथ मंदिरात देवदर्शन घेत असताना अचानक त्यांना 
ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची  प्राणज्योत मालवली.
सदरची घटना सोमवार दि.२२/०८/२०२२ रोजी घडली आहे.
   या घटनेमुळे नवेखेड व परीसरात  हळहळ व्यक्त केली जात आहे.
   त्यांच्या पश्यात पत्नी , दोन मुले , नातवंडे , भाऊ असा परिवार आहे, 


   रक्षाविर्सजन बुधवार दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ : ३० वाजता नवेखेड येथे कृष्णाकाठी होणार आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆