BANNER

The Janshakti News

खंडोबाचीवाडी ते पाचवामैल रस्ता, भिलवडी स्टेशन ओव्हरब्रीजसाठि 29 रोजी रास्तारोको=====================================


=====================================

भिलवडी | दि. २३ ऑगस्ट २०२२

खंडोबाचीवाडी ते पाचवामैल रस्ता अतीशय खराब झाला असुन या रस्त्याचे काम तसेच पलूस तालुक्यातील भिलवडी  स्टेशन येथील ओव्हरब्रीजचे चार वर्षे रखडलेले काम तातडीने पुर्ण करा या  मागणीसाठि 29 रोजी रास्तारोको करण्याचा ईशारा भिलवडी स्टेशन खंडोबाचीवाडी माळवाडी येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत पलुस तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. 
पुर्वीचा राज्यमार्ग  151 वर सन  2018 मध्ये हायब्रीड ऑनुटि या योजनेतुन राज्य सरकारने टोप ते पाचवामैल या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली होती. याचे काम पाठिमागील चार  वर्षात अतीशय संथ गतीने चालु आहे आणि जे काम झाले आहे ते अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले आहे.
 या रस्त्याच्या कामामुळे जनतेची सोय कमी त्रासच जास्त झाला आहे. गेली चार वर्षे या परीसरातील जनता हा त्रास सहन करत आहे राज्य मार्ग असताना आणि कोठ्यावधी रुपयांचा निधी मंजुर असताना या रस्त्यामुळे जनतेला चिखल आणि धुळीचा सामना गेली चार वर्षे करावा लागत आहे. या त्रासातुन जनतेची तातडीने सुटका करावी
जे काम झाले आहे ते हि अतीशय निकृष्ठ आहे. या कामाची तातडीने चौकशी व्हावी. 
तसेच भिलवडी रेल्वे स्टेशन येथे ओव्हरब्रीजचे काम सुरु आहे ते हि गेली चार वर्षे रखडले आहे त्यामुळे जनतेस विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे गेटमध्ये दिवसभरात  वहातुकिच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शेजारीच एच पी सी एल प्लांट आणि हजारवाडी गॅस प्लांट आहे याठिकाणी झालेल्या वहातुक समस्येमुळे या  प्लांटच्या सुरक्षेचा प्रश्नहि निर्माण झाला आहे. 
तरी या रेल्वे ओव्हरब्रीजचे कामहि तातडीने पुर्ण व्हावे. 


याबाबत वारंवार मागणी करुनहि रेल्वेचे अधिकारी तसेच अनेक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. 
या रस्त्याचे काम आणि रेल्वे ओव्हरब्रीजचे काम तातडीने पुर्ण करावे या मागणीसाठि सोमवार  29 ऑगस्ट 2022 रोजी भिलवडी स्टेशन येथे सकाळी  11 वाजता भिलवडी स्टेशन खंडोबाचीवाडी माळवाडी या गांवातील ग्रामस्थ  रास्तारोको करणार आहेत. 
याबाबत पलुस तहसिलदार निवास ढाणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संताजी जाधव,  माणिक माने, दत्ता उतळे, संतोष उंडे, प्रविण शिरतोडे उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆