BANNER

The Janshakti News

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; शिवसेनेत उडाली खळबळ शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर



=====================================


=====================================

मुंबई | दि. 19 जुलै 2022

    शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर आता मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार देखील फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी सेनेच्या खासदारांकडून करण्यात आली होती. याबाबत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एक पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.




       शिवसेना खासदारांच्या मनात सुरू असलेली खदखद लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला. त्यानुसार आज राष्ट्रपतीपदासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पण या मतदानानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाच्या बैठकीला हजरी लावल्याची माहिती समजत आहे

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆