BANNER

The Janshakti News

सौ. शुभांगी मन्वाचार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.सौ. शुभांगी मन्वाचार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.

======================================


======================================

भिलवडी | दि. ११ जुलै २०२२

भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजच्या माजी मुख्याध्यापिका सौ. शुभांगी मन्वाचार यांचा सेवानिवृत्ती निमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ  देवून सत्कार करण्यात आला.          उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले.  
            नियत वयोमानानुसार व शासकीय नियमानुसार सौ. शुभांगी मन्वाचार  या दि. 31/5/2022 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी एकूण 34 वर्षे सेवा केली. त्यांना शाळेच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका म्हणून मान मिळाला आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली आहे. या कार्याची दखल घेऊन कास्ट्राईब शिक्षक संघटनेने त्यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव केला आहे.           
       यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एस. एल माने, पर्यवेक्षिका सौ. राजकुमारी यादव यांच्या हस्ते उभयतांचा शाल, श्रीफळ, चांदीची मुर्ती देवून यथोचित सत्कार करण्यात आला.    यावेळी सौ. शुभांगी मन्वाचार यांनी संस्थेला एक लाख रुपयांची देणगी दिली. 

       या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त जे. बी चौगुले, संचालक गिरीश चितळे, दादासाहेब चौगुले, जयंत केळकर, व्यंकोजी जाधव, सचिव मानसिंग हाके, भिलवडी गावच्या सरपंच विद्या पाटील,ग्रामपंचायत सदस्यासौ. शेटे, माजी मुख्याध्यापक एस. एस भोकरे, बी. एन मगदूम, एच. आर. जोशी, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक मोहन पाटील,सहसचिव के. डी पाटील, महेश पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नलावडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक एस. एन कुलकर्णी यांनी मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆