BANNER

The Janshakti News

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.. असे म्हणत आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी उत्साहात संपन्न झाली.



जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.. असे म्हणत  आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी उत्साहात संपन्न झाली. 

======================================


======================================

नागठाणे | दि. १० जुलै २०२२

     जय जय राम कृष्ण हरी ..विठ्ठल- विठ्ठल,जय हरी विठ्ठल च्या आणि टाळ मृदुंगाच्या  गजरात सर्व बाल वारकरी मोठ्या उत्साहात सहभागी झाले... सारे वातावरण विठ्ठलमय होऊन विठ्ठल नामाचीच जणू शाळा भरली...


        मा. मुख्याध्यापक श्री सुनील मोरे सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली... विठ्ठल रुक्मिणी च्या वेषातील गोड चिमुकले सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते... 
      हे विठ्ठला तुझी कृपादृष्टी आम्हावर राहू दे ...तुझा वारकरी आणि माझा बळीराजा तुझ्या प्रेमसरीत अखंड भिजू दे ...सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे असं साकडं सगळ्या बाल वारकऱ्यांनी विठ्ठलाला घातले...


     यावेळी  सहाय्यक शिक्षिका स्नेहल पाटील मॅडम यांनी आपल्या गोड आवाजात विद्यार्थ्यांना विविध अभंग व विठ्ठल भक्ती गीते सांगितली..
     यावेळी श्री केशव गायकवाड सर, राजनंदिनी माने मॅडम तसेच  सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ .रागिणी धनवडे मॅडम उपस्थित होत्या...
       एकंदरीत आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे ची वारकरी दिंडी उत्साहात संपन्न झाली...



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆