======================================
======================================
भिलवडी | दि. १२ जुलै २०२२
गुरुजनहो तुम्ही भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला विद्यार्थी घडविण्याचे कार्य करण्याची संधी मिळाली आहे,प्रत्येक मुलामध्ये ईश्वराचे रूप बघून त्याच्याशी समरस व्हा,काळाबरोबर स्वतः मध्ये बदल करीत आनंददायी पद्धतीने वर्ग अध्यापन करा असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले.
भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयात शिक्षण विभागाच्या वतीने भिलवडी व वसगडे केंद्रातील शिक्षकांसाठी आयोजित आनंददायी शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सेकंडरी स्कूल चे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी होते.
सजगता,कृती,कथा, अभिव्यक्ती, दिव्यांग,लिंग समभाव या विषयी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.सुषमा देशमाने,भाग्यश्री चौगुले,प्रताप मोकाशी,पौर्णिमा धेंडे,संभाजी कांबळे,मीना शेटकार, शहीराबी जमादार,शैलजा चव्हाण,रोहित गुरव,आनंदी भंडारे,स्मिता पाटील,प्राजक्ता कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले.
पंचायत समिती पलूस चे विषय तज्ञ धनंजय भोळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.केंद्रप्रमुख अशोक कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले.दिलीपकुमार मदने यांनी आभार मानले.
यावेळी प्रा.महेश पाटील,मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,राजेंद्र कांबळे,हिम्मतराव यमगर,राजेंद्र माळी,बाळासाहेब कोळी आदींसह भिलवडी व वसगडे केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆